शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

दादर स्थानकात ठाणे लोकलला आग, प्रवाशांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 9:54 PM

दादर स्थानकात ठाण्याला जाणा-या लोकलला आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबई : दादर स्थानकात फलाट क्रमांक 1 वरून कल्याणच्या दिशेनं जाणा-या ठाणे लोकलमध्ये आग लागल्याची घटना घडली . शुक्रवारी रात्री 9 वाजून 24 मिनिटांनी ही घटना घडली. सीएसएमटी येथून निघालेली ठाणे लोकल दादर स्थानकात पोहोचली. लोकल ठाणे दिशेने थोडी पुढे निघाली असता अचानक लोकल बोगीतून धूर येत असल्याने प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. ब्रेक-बायडिंगमुळे आग लागली असून 10 मिनिटांत आग नियंत्रणात आणण्यात आली. आगीमुळे केवळ 3 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या उर्वरित फे-या फलाट क्रमांक 4 वरुन वळविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. दादर स्थानकातील घटनेमुळे डाऊन दिशेसह अप धीम्या लोकलची वाहतूक ही थांबवण्यात आली. त्याच बरोबर कल्याण-कसारा दिशेला जाणाºया लोकल परळ, भायखळा या स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी व्यक्त केली आहे. ‘पुढील सूचना मिळेपर्यंत करी रोड, चिंचपोकळी रेल्वे स्थानकांवर लोकल थांबवण्यात येणार  नाही, अशी उद्घोषणा परळ, करीरोड आणि चिंचपोकळी स्थानकात करण्यात आली. यामुळे रेल्वे स्थानकांदरम्यान उभ्या असलेल्या जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू झाली.रात्री उशिरा घरी परतणा-या कर्मचा-यांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला.  लोकलमधून धूर येत असल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे. मध्य रेल्वेनं आगीवर नियंत्रण मिळवल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 5 फायर इंजिन आणि 4 जम्बो टँकरच्या मदतीने आग नियंत्रणात आली. या घटनेत रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. 

रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दलाने तातडीने उपाययोजना केली. आग लागल्यानंतर यंत्रणेने त्वरित आगीवर नियंत्रण मिळविले. फलाट क्रमांक १ वगळता अन्य मार्गांवरून वाहतूक सुरू करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात येईल.- एस.के. जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

टॅग्स :Mumbaiमुंबई