शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

ड्रगमाफिया बेबी पाटणकर गजाआड

By admin | Published: April 23, 2015 6:08 AM

गेल्या दीड महिन्यापासून मुंबई व सातारा पोलिसांना चकवा देणारी महिला ड्रगमाफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकर अखेर गजाआड झाली.

मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून मुंबई व सातारा पोलिसांना चकवा देणारी महिला ड्रगमाफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकर अखेर गजाआड झाली. पाटणकर खासगी लक्झरी बसने सिंधुदुर्गमधील कुडाळहून मुंबईला येत होती. काल पहाटे सहाच्या सुमारास मुंबईच्या गुन्हे शाखेने पनवेलजवळ बस रोखून पाटणकरला ताब्यात घेऊन तिला अटक केली.१० मार्चला सातारा पोलिसांनी खंडाळा तालुक्यातील कान्हेरी गावातून पोलीस शिपाई धर्मराज काळोखे याला अटक केली होती. त्याच्या घरातून एमडी या अमली पदार्थाचा सुमारे ११४ किलोचा साठा हस्तगत करण्यात आला. काळोखे मुंबईच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याच्या चौकशीतून पाटणकरचे नाव पुढे आले होते. पाटणकर मुंबई पोलिसांच्या विशेषत: अमली पदार्थविरोधी पथकाच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. तिचे संपूर्ण कुटुंब अमली पदार्थांची तस्करी, खरेदी आणि विक्रीत सहभागी आहे. तिचा मुख्य अड्डा वरळीत आहे. काही वर्षांपूर्वी काळोखेची वरळी पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती, तेव्हापासून दोघांची ओळख होती. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध होते. तसेच पाटणकरच्या अमली पदार्थांच्या धंद्यात काळोखेचा सक्रिय सहभाग होता. त्याच्याकडून सातारा पोलिसांनी हस्तगत केलेला व मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातून सापडलेला एमडीचा साठा पाटणकरच्या मालकीचा होता.सातारा पोलिसांच्या कारवाईआधी काही दिवसांपासून काळोखे-पाटणकर खासगी कारमधून कोकणात भटकंती करीत होते. याच कारने काळोखे कान्हेरी गावापर्यंत आला. तो गावी आपल्या घरी गेला तर पाटणकर कारने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. ही घडामोड समजताच मरिन ड्राइव्ह पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस ठाण्यातील काळोखेच्या कपाटाची झाडाझडती घेतली, तेव्हा कपाटात काळोखेने दडविलेले सुमारे दोन किलो एमडी, विदेशी मद्याच्या बाटल्या, परकीय चलन असा ऐवज सापडला. काळोखेला त्याच्या गावी सोडल्यानंतर पुढे निघालेल्या पाटणकरचा मात्र काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. तेव्हापासून सातारा पोलीस, मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकासह गुन्हे शाखेची सर्व युनिट्स, गुन्हे शाखेची अमली पदार्थविरोधी पथके, मरिन ड्राइव्ह पोलीस तिचा तपास करीत होते. सहआयुक्त (गुन्हे) अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (पाटणकर) खासगी बसने मुंबईला येत असल्याची माहिती समाजसेवा शाखेचे निरीक्षक जगदेव कालापाड, निशिकांत विश्वकर, पोलीस शिपाई घाग, शिट्याळकर, खैरे, महिला पोलीस शिपाई जाधव या पथकाला मिळाली. त्यानुसार उपायुक्त (अंमलबजावणी) प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने काल पहाटे पनवेलमध्ये ठाण मांडले. संबंधित खासगी बस येताच ती रोखून या पथकाने झडती घेतली, तेव्हा तीन नातेवाइकांसह पाटणकर सापडली. तिला ताकाळ ताब्यात घेऊन मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी तिला अटक केली. न्यायालयाने तिला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.