अकोला : येथे २८ व २९ जानेवारी रोजी होणाऱ्या चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही जबाबदारी पार पडू शकत नाहीत. त्यामुळे आता ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीकडून रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने चार वर्षांपासून अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. या वर्षी अकोला येथील स्वराज्य भवनच्या प्रांगणात २८ व २९ जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे, तर डॉ. अभय पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. संमेलनासाठी राज्यभरातून संत साहित्यिक, लेखक, समीक्षक, व्याख्याते राष्ट्रीय कीर्तनकार, कवी, भजन गायक, कलावंत, नाटककार आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी डहाके
By admin | Published: January 02, 2017 5:22 AM