शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

डहाणू परिषदेच्या बेफिकीरीने शासनाचे २० लाख रूपये पाण्यात

By admin | Published: March 01, 2017 3:01 AM

डहाणू समुद्रकिनाऱ्यावर बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो पर्यटकांना विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ माफक दरात उपलब्ध व्हावे

डहाणू : या नगरपरिषद प्रशासनाच्या ढीसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे शहरात कोट्यवधींची असंख्य विकास कामे अर्धवट स्थितीत पडून आहेत तर डहाणू शहरातील पारनाका येथील डहाणू समुद्रकिनाऱ्यावर बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो पर्यटकांना विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ माफक दरात उपलब्ध व्हावे व महिला बचतगटांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने उभारलेल्या १९ पर्यटन स्टॉलची दुर्दशा झाली आहे. गेल्या चार,पाच वर्षांपासून हे स्टॉल बचतगटाना न दिल्याने हे स्टॉल वापराविना धूळखात पडून त्याची परझड होऊन ते निकामी झाल्याने शासनाचे वीस लाख रूपये पाण्यात गेले आहेत. सुशिक्षित बेरोजगार व महिला बचतगटात याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. डहाणूच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर रोज तसेच सुट्टी व सणासुदीच्या दिवसात गुजरात तसेच महाराष्ट्रभरातील हजारो पर्यटक येतात परंतु या परीसरात त्यांना हवे असलेले खाद्य पदार्थ रास्त दरात मिळत नाहीत व मोठ्या हॉटेलमधील पदार्थांचे दर परवडत नाहीत परीणामी येथे येणाऱ्या पर्यटकांची सोय व्हावी व परिसरातील स्थानिक महिला बचतगटांचे सक्षमीकरण व्हावे व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने डहाणू नगरपरिषद तसेच वनव्यवस्थापन समिती (डहाणू) यांनी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत १९ लाख पंचवीस हजार रूपये खर्च करून हे स्टॉल उभारले परंतु गेल्या चार पाच वर्षापासून त्याचे वाटप महिलाबचत गटाना करण्यात न आल्याने ते धूळखात पडले व त्याची पार दुर्दशा झाली आहे.महिला बचतगट सक्षमीकरण होणे तर दुरच राहिले उलट शासनाचे २० लाख रूपये मात्र डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे वाया गेले आहेत. (वार्ताहर)>पर्यटन स्टॉल महिलाबचत गटाना देण्यासाठी तीन वेळा निविदा काढण्यात आली परंतु प्रतिसाद मिळत नाही शिवाय रात्रीच्या सुमारास येथे अनैतिक कृत्य होत असल्याची तक्रार नगरसेवकानी केल्याने स्टॉल्सच्या लाकडी फळया काढून ठेवण्यात आलेले आहेत.-विनोद डवले, मूख्याधीकारी,डहाणू नगर परिषद