पुणो : भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपापल्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली असून, यंदा इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आह़े असे असतानाही हे इच्छुक सध्या शक्तिप्रदर्शन करायचे की नाही, याबाबत तळ्यात-मळ्यात भूमिका घेत आह़े कारण आहे तोंडावर आलेला दहीहंडी उत्सव आणि पाठोपाठ येणारा गणोशोत्सव़
निवडणुका ही संधी असल्याचे जसे सर्व पक्ष समजतात, तसेच आता कार्यकर्ते, विविध मंडळे ही संधी साधून घेण्याचा विचार करू लागले आहेत़ त्यामुळे उमेदवारी जाहीर केली आणि शक्तिप्रदर्शन सुरू करण्याचा प्रयत्न केला की मंडळांचा ससेमिरा सुरू होईल, अशी या इच्छुकांना भीती वाटत आह़े
गेल्या दोन वर्षापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी होती़ निवडणुका लक्षात घेऊन अनेक मंडळांनी गणोशमंदिरांची बांधकामे काढली़ इच्छुकांना अनेक मंडळांनी आमचा तुम्हालाच पाठिंबा असल्याचे सांगत, मंदिरासाठी घसघशीत रक्कम मिळविली़ ज्यांचे मंदिर बांधून झाले होते, त्यांनी समोरची फरशी बसवायचीय, ढोल ताशा घ्यायचा आहे, डॉल्बी सिस्टिम अशी वेगवेगळी कारणो सांगून या इच्छुकांकडून मोठा पैसा मिळविला होता़
विशेष म्हणजे अनेक मंडळांनी एकाच वेळी अनेक इच्छुकांकडून अशी वेगवेगळी कारणो सांगून पैसे मिळविले होत़े विधानसभा निवडणुकीला यंदा अनेक नगरसेवकही इच्छुक आहेत़ गेल्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, यंदा या निवडणुका अधिक चुरशीच्या होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आह़े त्यामुळे आतापासूनच शक्तिप्रदर्शनास सुरुवात केली तर या मंडळांच्या रांगा लागतील आणि कोणत्याही मंडळाला दुखवायचे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार असल्याने हे इच्छुक द्विधा मनस्थितीत आहेत़
आता या इच्छुकांना आपल्या वरिष्ठांवर किती विश्वास ठेवावा, अशी चिंता सतावत आह़े मुलाखती, उमेदवारी अर्ज मागविण्यात येत असले तरी कार्यकत्र्याची भावना वरिष्ठ जाणून घेतीलच, असा विश्वास आता इच्छुकांना राहिलेला नाही़ भारतीय जनता
पक्षातील इच्छुकांमधील अनेकांना मुलाखती या केवळ फॉम्यरुलिटी पूर्ण करण्यासाठी केल्या असल्याचे वाटत आह़े प्रत्यक्षात कोणाला पक्षात घ्यायचे आणि कोणाला तिकीट द्यायचे, हे केंद्रीय समितीने जवळपास निश्चित केले असल्याचे त्यांना वाटत आह़े त्यामुळे जर तिकीटच मिळणार नसेल तर इतका खर्च करायचा का, असा प्रश्न या इच्छुकांपुढे उभा आह़े
ही परिस्थिती अन्य पक्षातही दिसून येत आह़े त्यामुळे ज्यांना खात्री आहे असेच दावेदार सध्या लोकांसमोर उघडपणो आपण इच्छुक असल्याचे सांगू लागले आहेत़ कार्यकत्र्याची बांधणी करण्यास सुरुवात करीत आहेत़
पक्षाकडून तिकिटाची खात्री नसण्याबरोबरच एकूणच प्रचाराचा वाढलेला खर्चही अनेकांना खटकत आह़े त्यामुळे आपल्याही विजयाची शक्यता किती याबाबत माहीतगार संस्थांकडून चाचपणी करून घेण्याकडेही इच्छुकांचा कल आह़े आज विधानसभा मतदारसंघातील वाढलेली मतदारांची संख्या लक्षात घेता साधे एक पत्रक सर्व मतदारांर्पयत पोहोचवायचे तर लाखाहून अधिक खर्च येतो़ त्यात पक्षाकडून कोणतीही खात्री मिळत नसल्याने असा खर्च करायचा का, असा विचार काही जण करीत आहेत़
(प्रतिनिधी)
4दुसरीकडे ज्यांना आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळेल अशी खात्री वाटत आहे; किंबहुना आपल्या पक्षाने तिकीट नाही दिले तरी दुस:या पक्षाकडून आपण उमेदवारी मिळवू असा विचार ज्यांना वाटत आहे, अशा दावेदारांनी शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली आह़े त्यात वाढदिवस ही सर्वात मोठी संधी असल्याचे समजून त्यानिमित्त अनेकांनी सप्ताह साजरे करण्यास सुरुवात केली आह़े त्या सर्व प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे, तरुणांसाठी ट्रेकच्या कॅम्पचे आयोजन अशा बाबींवर भर देण्यास येत आहे. मात्र, इच्छुकांच्या मानाने त्यांची संख्या कमी आह़े
4पक्षाकडून तिकिटाची खात्री नसण्याबरोबरच एकूणच प्रचाराचा वाढलेला खर्चही अनेकांना खटकत आह़े त्यामुळे आपल्याही विजयाची शक्यता किती याबाबत मान्यवर संस्थांकडून चाचपणी करून घेण्याकडेही इच्छुकांचा
कल दिसून आला आह़े आज विधानसभा मतदारसंघातील वाढलेली मतदारांची संख्या
लक्षात घेता साधे एक पत्रक सर्व मतदारांर्पयत पोहोचवायचे तर लाखाहून अधिक खर्च येतो़
त्यात पक्षाकडून कोणतीही खात्री मिळत नसल्याने असा खर्च करायचा का, असा विचार काही जण करीत आहेत़
4 भारतीय जनता पक्षाने नुकत्याच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या़ लोकसभा निवडणुकीत अनेक जण आर्थिक व अन्य बाबतींत ताकदवान नसतानाही केवळ मोदी लाटेमुळे निवडून आल़े त्यामुळे भाजपकडील इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आह़े त्याचा परिणाम शहरातील अनेक मतदारसंघांत इच्छुकांची संख्या 16 र्पयत वाढली आह़े त्यातील अनेकांना मागील महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने तिकीटही दिले नव्हत़े तर तिकीट दिलेल्यांपैकी काहींना अगदी तिस:या, चौथ्या क्रमांकांची मते मिळाली आहेत़ तरीही केवळ पक्षाचे अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते असल्याने आपल्यालाही संधी मिळावी, यासाठी इच्छुक बनले असल्याचे दिसून येत आह़े
4इच्छुकांना आपल्या वरिष्ठांवर किती विश्वास ठेवावा अशी चिंता सतावत आह़े मुलाखती, उमेदवारी अर्ज मागविण्यात येत असले तरी कार्यकत्र्याची भावना वरिष्ठ जाणून घेतीलच, असा विश्वास आता नाही़
4 पक्षाकडून तिकिटाची खात्री नसण्याबरोबरच एकूणच प्रचाराचा वाढलेला खर्चही अनेकांना खटकत आह़े विजयाची शक्यता किती याबाबत माहीतगार संस्थांकडून चाचपणी करून घेण्याकडेही इच्छुकांचा कल आह़े