पुणे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ जिल्ह्यांतील तब्बल २ लाख, १ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, कोल्हापूर आणि सांगलीला सर्वाधिक फटका बसला आहे. फळबागांचे नुकसान झाले असल्यास त्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत बागांची पुनर्उभारणी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.क्षीरसागर यांनी विभागातील कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात बैठक बोलावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र ओला दुष्काळाला सामोरा जात आहे. तर, मराठवाड्यात अजूनही सहाशे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, मांजरा आणि अन्य प्रकल्पात पाणी नाही. पश्चिम महाराष्ट्रात उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रांनुसार दोन लाखांहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. फळबागांसह इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. फळबागांच्या नुकसानीसाठी सरकार संपूर्ण मदत देईल. खड्डे खोदण्यापासून ते रोपे देण्यापर्यंत संपूर्ण मदत केली जाईल. शिवाय मागेल त्याला शेततळे हे धोरण राबविण्यात येईल.आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्हे, कायम दुष्काळी तालुके आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७७ तालुक्यांमधे ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान दिले जाईल. तसेच, मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती पाहता, मागेल त्याला काम हे धोरण तेथे राबविण्यात येईल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.पुरामुळे बाधित झालेल्या शेतीचा प्राथमिक अंदाज(क्षेत्र हेक्टरमधे)जिल्हा बाधित क्षेत्ररायगड १७,७५५.२०ठाणे २,१७५.०२सिंधुदुर्ग ९,७९४.२०पालघर ११,४८४.३१धुळे १,२२३.६०नाशिक २२,३३४.१०सातारा २३,११६.५३सांगली २०,५७१कोल्हापूर ६,८६१०पुणे १२,८९१सोलापूर १०,८२०.२०अहमदनगर ६४४वर्धा ७७
२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 3:05 AM