शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

दमणगंगा-पिंजाळचा जुना करार रद्द, ठाणे-भिवंडी बायपास आठ पदरी बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:46 AM

विशेष प्रतिनिधी मुंबई : आघाडी सरकारच्या काळात दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाबाबत झालेला करार रद्द करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी गुजरातची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्र सरकारचे काही आक्षेप होते. आता त्या बाबत महाराष्ट्राचे समाधान होईल, असा निर्णय घेऊन ५० टीएमसी पाणी गोदावरी खो-यात वळविले जाईल आणि त्याचा ...

विशेष प्रतिनिधी मुंबई : आघाडी सरकारच्या काळात दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाबाबत झालेला करार रद्द करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी गुजरातची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्र सरकारचे काही आक्षेप होते. आता त्या बाबत महाराष्ट्राचे समाधान होईल, असा निर्णय घेऊन ५० टीएमसी पाणी गोदावरी खो-यात वळविले जाईल आणि त्याचा फायदा मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला तसेच मुंबईलादेखील होईल. या भागातील मोठी धरणे त्यामुळे दरवर्षी १०० टक्के भरतील, असे केंद्रीय जलसंपदा व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र परिषदेत सांगितले.पार-तापी योजनेचा फायदा नाशिक, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना होणार आहे. विदर्भातील अत्यंत महत्त्वाकांक्षी असा गोसीखुर्द सिंचन प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. राज्य सरकारने त्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ची डेडलाइन ठरविली आहे. तथापि, आज गडकरी यांनी आम्हाला हे काम ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुंबईतील रस्त्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास आपला विभाग तयार आहे, असे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. रस्ते बांधताना वा दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान महापालिकेने वापरायला हवे, असा सल्ला गडकरींनी दिला....तर राहुल गांधींना ५ हजार कोटी देऊ-राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असून ३५ हजार कोटी नव्हे तर ५ हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे, असा आरोप कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी राहुल गांधी यांना ५ हजार कोटी रुपये देतो. त्यांनी राज्यातील शेतकºयांचे कर्ज माफ करून दाखवावे. आमची कर्जमाफी ही देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असा दावाही त्यांनी केला.ठाणे-भिवंडी बायपास आठ पदरी बनविणार-ठाणे-भिवंडी बायपास हा आठ पदरी बनविण्यात येईल आणि त्यासाठीच्या निविदा येत्या तीन महिन्यांत काढण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामाच्या पाच निविदा काढण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प ४४ हजार कोटी रुपयांचा आहे. या मार्गावरील वर्सोवा ब्रिजच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्याला पर्यावरणविषयक मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आजच दिलेले आहेत. येत्या दीड महिन्यात ते काम सुरू होईल, असे गडकरी यांनी एका प्रश्नात सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी