मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना, अज्ञाताकडून अश्लील फोन कॉल करण्यात येत आहेत. ‘अंजलीशी खट्टीमिटी बाते करो फ्री’ असे नमूद करून त्यांचा मोबाइल नंबर असलेली जाहिरात रेल्वेत लावण्यात आली आहे. त्यामुळे देशातील विविध भागांतून फोन येत असल्याचे टिष्ट्वट खुद्द दमानिया यांनी करून, ही बाब चव्हाट्यावर आणली आहे, तसेच या प्रकरणी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना टिष्ट्वट करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.सार्वजनिक ठिकाणी माझा मोबाइल क्रमांक जाहीर करून, राजकारण्यांनी पातळी सोडून घाणेरड्या पद्धतीने त्रास देण्यास सुरुवात केली आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. खडसे यांच्या भ्रष्टाचाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल शासनाला सादर करण्याबाबत आझाद मैदावर आंदोलन केले होते. त्यानंतर, त्यांना त्रास देण्यासाठी अज्ञाताने एका पॅसेंजर रेल्वेतील बोगीत ‘अंजलीशी खट्टीमिटी बाते करो फ्री’ असे नमूद करून, त्यांचा मोबाइल नंबर असलेली जाहिरात चिकटविली आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, दमानिया यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे मंंत्रालय, मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलिसांच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटला टॅग केले.त्यानंतर, रेल्वे मंत्रालयाच्याटिष्ट्वटर अकाउंटवरून मध्य रेल्वेवरील भुसावळ विभागासह नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विभागाला या प्रकरणी लक्ष देण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने केल्या. त्याचबरोबर, मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षा दलालादेखील सार्वजनिक करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकाचे स्टिकर त्वरित काढून टाकण्याच्या सूचना केल्या. रेल्वेच्या टिष्ट्वटर अकाउंटवरूनत्वरित प्रतिसाद आल्याने,दमानिया यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.
बदनामीबाबत दमानिया यांची रेल्वेकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 6:30 AM