शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

डमी भाऊसाहेब हाकताहेत गाडा

By admin | Published: July 23, 2016 1:51 AM

तलाठी कार्यालयात हमखास तलाठी भेटणे दुर्लभ असले, तरी तुमची सर्व कामे तुम्हाला पाहिजे त्या वेळी चुटकीसरशी करता येतात.

टीम लोकमत,

तळेगाव दाभाडे- तलाठी कार्यालयात हमखास तलाठी भेटणे दुर्लभ असले, तरी तुमची सर्व कामे तुम्हाला पाहिजे त्या वेळी चुटकीसरशी करता येतात. फक्त यासाठी तुम्हाला तो मागेल तेवढे पैसे मोजावे लागतात. डमी भाऊसाहेब म्हणजे तलाठ्याने स्वत:ची कामे करण्यासाठी ठेवलेला कामगार. एका तलाठ्याकडे साधारण गावांच्या लोकसंख्येनुसार तीन ते चार गावे असतात. जितकी गावे आहेत, तेवढे कामगार म्हणजेच डमी भाऊसाहेब तो ठेवतो. >ठिकाण : वडगाव मावळ वेळ : स. १०प्रतिनिधी : भाऊसाहेब कुठे आहेत?डमी भाऊसाहेब : भाऊसाहेब आॅनलाइन प्रशिक्षणाला गेले आहेत.प्रतिनिधी : जमिनीवरील कूळ काढायचे आहे.डमी भाऊसाहेब : साताबारा घेऊन या, किती खर्च ते सांगतो.(प्रतिनिधी कार्यालयातून बाहेर पडतात. एवढ्यात डमी भाऊसाहेबांनी ठेवलेला एक जण बाहेर येतो.)प्रतिनिधी : जमिनीवर बोजा चढवायचा आहे.डमी भाऊसाहेबाचा सहायक : घेऊन या सातबारा, लगेच करून देतो.>ठिकाण : तळेगाव दाभाडे वेळ : दु. १२प्रतिनिधी : तलाठी भाऊसाहेब कुठे आहेत?डमी भाऊसाहेब : आॅनलाइनच्या कामासाठी बावधनला गेले आहेत. प्रतिनिधी : जमीन खरेदीची नोंद करायची आहे.डमी भाऊसाहेब : दोन महिने लागतील.प्रतिनिधी : त्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?डमी भाऊसाहेब : भाऊसाहेबच सांगतील खर्च किती ते.तलाठी कार्यालय तळेगाव दाभाडे येथे गेलो असता तलाठी कार्यालयात भाऊसाहेबच नव्हते. कारकुनला विचारले असता भाऊसाहेब/ अथवा तलाठी बावधन आॅनलाइनची कामे करतात. दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीने जमीन घेतली असता त्याची नोंद करण्यासाठी २ महिने लागतात, असेही कारकुनांनी सांगितले. पैसे विचारले असता भाऊसाहेबांनाच माहिती आहे, असे सांगितले. >वारसनोंद करण्यासाठी कायदेशीर व विनाकायदेशीर हवे ते नाव टाकणे किंवा वगळण्यासाठी ५००० ते ५०००० रुपये विविध दाखले देणे, रेशनिंग कार्डवर नावे चढवणे कमी करणे, उत्पन्नाचे दाखले देणे , कर्जबिलं, बाकीचे दाखले देणे यासाठी १०० ते १००० रुपये. नोंद करण्यासाठी सरकारी कालावधी १५ दिवस असताना डमी भाऊसाहेब ही कामे ८ दिवसांत करतात. सातबाऱ्याचे फेरफार काढण्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत? किती दिवसांत पाहिजेत? समोरील माणूस पाहून पैसे घेतले जातात.छोटे व्यवहार असतील, तर हे कार्यालयातच होतात. मोठे व्यवहार असतील, तर कार्यालयाबाहेरील चहाची टपरी, हॉटेल किंवा ढाब्यांवर होतात. पैसे देवाणघेवाणासाठी विशिष्ट व्यक्तींचा वापर केला जातो. हे डमी भाऊसाहेब तलाठ्याची सर्व कामे करत असून, यातून मिळणाऱ्या अवैध कमाईचा काही वाटा तलाठी या भाऊसाहेबांना देतात. इस्टेट एजंट, शेतकरी व नागरिक तलाठ्यापेक्षा या डमी भाऊसाहेबांची मर्जी सांभाळण्यासाठी मोठा खर्च करतात. तलाठी कार्यालयातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे व इतर दस्तावेज हे सहजपणे हाताळतात. तलाठी भाऊसाहेबांना जेवढी आपल्या भागाची माहिती नसते, त्यापेक्षा जास्त इत्थंभूत माहिती या डमी भाऊसाहेबांकडून मिळते. >ठिकाण : करंजगाव, वेळ : दु. १२.३०प्रतिनिधी : भाऊसाहेब दिसत नाहीत.डमी भाऊसाहेब : नाहीत हो. बोला काय काम?प्रतिनिधी : जमिनीवर नाव लावायचे आहे. किती दिवस लागतील?डमी भाऊसाहेब : नाव येण्यासाठी २५ दिवस लागतात. तांत्रिक अडचण आल्यास दीड महिना लागतो. प्रतिनिधी : किती खर्च येईल?डमी भाऊसाहेब : पंधरा हजार द्या, तुमची सगळी कामे करतो. आता आॅनलाइन प्रक्रिया असल्यामुळे उताऱ्यावर नवीन खरेदीदाराचे नाव येण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु, काही तांत्रिक अडचणी आल्यास दीड ते दोन महिनेही लागतात, असं त्याच्याकडून सांगण्यात आलं. आणि खर्च किती येईल? यावर त्यांनी १५००० खर्च येईल, असे संगितले.