शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

ती भेट शेवटची : 'दामिनी' प्रतीक्षा लोणकर यांनी जागवल्या रमेश भाटकर यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 6:44 PM

एखादी व्यक्ती आयुष्यात सहकलाकार म्हणून येते मात्र व्यक्ती म्हणून तिचा मोठेपणा कायम मनावर कोरला जातो अशा शब्दात 'दामिनी'फेम मालिकेच्या कलाकार प्रतिक्षा लोणकर यांनी दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या आठवणी जागवल्या. 

 नेहा सराफ - कंकरेज 

पुणे : एखादी व्यक्ती आयुष्यात सहकलाकार म्हणून येते मात्र व्यक्ती म्हणून तिचा मोठेपणा कायम मनावर कोरला जातो अशा शब्दात 'दामिनी'फेम मालिकेच्या कलाकार प्रतिक्षा लोणकर यांनी दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या आठवणी जागवल्या. 

                त्या म्हणाल्या की, दामिनीच्या मालिकेत तशी भाटकर यांची इंट्री उशिरा झाली. ते आले तेव्हा मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर होती. त्यावेळी माझं (दामिनीचं) किरण करमरकर साकारत असलेल्या पात्रावर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं होत. मात्र अचानक भाटकर साकारत असलेल्या पात्राशी लग्न होतं आणि मालिकेला नवं वळण मिळत. मात्र आमच्या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरलं, इतकंच नव्हे आमचे सीनही आवडल्याचे अनेकजण सांगायचे. त्यामुळे कलाकार म्हणून आम्हाला एकत्र काम करताना खूप आनंद मिळाला. आमच्या त्या काळातल्या अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत. एकदा दिग्दर्शक सीन समजावत असताना ते अचानक मागे धूळ झटकायचा फडका मारू लागले. ते काय करतात असं विचारल्यावर म्हणाले, ' आता दामिनी अवधी करारी असेल तर तिच्या नवऱ्याला तर फडकाच मारावा लागणार ना' !त्यांच्या या वाक्याने सेटवर हशा पिकला होता. छान खेळकर वातावरणात काम करण्याची त्यांची सवय सहकलाकार म्हणून लक्षात राहणारी आहे. 

                 व्यक्ती म्हणून बोलायचं झाल्यास ते त्या काळी इन्स्पेक्टर, कलेक्टर अशा भूमिका करायचे. त्यांच्या हँडसम दिसण्यामुळे अनेक मुली त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायच्या. मुळात नाटकातून ते पुढे आल्यामुळे प्रत्येक भूमिकेत ते स्वतःचा रंग भरायचे. ते गाण सुरेख  म्हणायचेच पण त्या सोबत कोणत्याही वयातील व्यक्तीसोबत त्यांचे जमायचे. काळाबरोबर पुढे जाताना त्यांनी कायम नवनव्या गोष्टी आत्मसात केला. अगदी आत्तापर्यंत ते टेलिव्हिजन सीरियलमध्ये काम करत होते. मित्रांमध्ये तर ते अगदी 'यारों का यार' होते. अशा व्यक्तींचं जाणं कायमच हळहळ लावणारं असतं. काही दिवसांपूर्वी आम्ही एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात भेटलो होतो. आमच्या हातून सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार दिले होते. त्यावेळी ही आमची शेवटची भेट असेल असे मनातही आले नव्हते. त्यांचा उत्साह, उमदेपणा कधीच विसरला जाणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूRamesh Bhatkarरमेश भाटकर