शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
3
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
4
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
5
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
6
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
7
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
8
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
9
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
10
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
11
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
12
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
13
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
14
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
15
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
16
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
17
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
18
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
19
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

नाचता येईना.. अंगण वाकडं !

By admin | Published: January 20, 2017 12:16 AM

मुलांनोऽऽ, आज तुम्हाला काही म्हणी शिकवतो. घ्या पटापटा लिहून.

(स्थळ : गावाबाहेरच्या शाळेत गुरुजी म्हणींचा अभ्यास घेण्यात मग्न.. तर वर्गाबाहेर पारावर बसलेले कार्यकर्ते पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात दंग.)गुरुजी : मुलांनोऽऽ, आज तुम्हाला काही म्हणी शिकवतो. घ्या पटापटा लिहून.कार्यकर्ते : (मथळे वाचत) नाशिकमध्ये कॉँग्रेस आघाडीची म्हैस पाण्यातच !गुरुजी : बैल गेला अन् झोपा केला.कार्यकर्ते: ‘महायुतीचा धर्म पाळा, अन्यथा स्वबळावर लढणार !’ - इति विनायक मेटे अन राजू शेट्टी.गुरुजी : नागोबा-म्हसोबा पैशाला दोन. पंंचमी झाल्यावर पुजतंय कोण ?कार्यकर्ते : निवडणुकीत नोटाबंदीचा सत्ताधाऱ्यांना त्रासदायक ठरणार !गुरुजी : ऐन दिवाळीत दाढदुखी !कार्यकर्ते : भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटेना.गुरुजी : तुझं माझं जमेना... तुझ्या वाचून करमेना.कार्यकर्ते : ‘आघाडी’च्या बिघाडीचा खरा केंद्रबिंदू साताऱ्यातच. - सुनिल तटकरे यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला. गुरुजी : नाचता येईना.. अंगण वाकडं !कार्यकर्ते : राज ठाकरे यांची घोषणा, ‘युतीसाठी कुणाचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू.’गुरुजी : तेल गेलं, तूप गेलं..हाती धुपाटणे आलं !कार्यकर्ते : अजितदादा पवार यांचा गंभीर आरोप, ‘भाजप सध्या गुंडांचा पक्ष बनलाय!’गुरुजी : सौ चुहे खा के बिल्ली... वर्गातली मुलं : पण गुरुजी.. ही म्हण नेमकी कुणासाठी ?गुरुजी : दोघांसाठीही ! म्हणजे उंदीर अन् मांजरासाठी..कार्यकर्र्ते : भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढल्याने युतीसाठी इच्छुक असलेल्या शिवसैनिकांची कोंडी.गुरुजी : करायला गेले नवस अन् आज निघाली अवस ! कार्यकर्ते : निवडणूक आयोगाच्या फतव्यानुसार प्रचारातला नाष्ट्याचा दर म्हणे केवळ पंधरा रुपये. इच्छुक उमेदवार हैराण.गुरुजी : तोंड दाबून बुक्क्याचा मार!कार्यकर्र्ते : ‘मुंबईत भावी महापौर कुणाचा?’ यावरून भाजप-शिवसेनेत संघर्ष.गुरुजी : बाजारात तुरी अन् ७७ ७७७ ला मारी!कार्यकर्ते : ‘महायुती’तल्या इतर घटक पक्षांनाही म्हणे निवडणुकीत भरपूर जागा हव्यात.(एवढ्यात गुरुजींना ठसका लागतो. ते पाणी पिऊ लागतात. तोपर्यंत मुलंच पुढची अस्सल गावरान म्हण सांगतात.) वर्गातली मुलं : (एकसुरात) पायलीची सामसूमअन् चिपट्याची धामधूम.- सचिन जवळकोटे