मुंबई: अधूनमधून बरसणाऱ्या मान्सूनच्या सरी मुंबईकरांना सुखावत असल्या तरी तलाव क्षेत्रात मात्र पावसाने दांडीच मारली आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस तलावांच्या पातळीत घट होत आहे़ असे असले तरी गेल्या पाच वर्षांतील जलसाठ्याच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अधिक असल्याने पालिकेने सुबरीचा मार्ग स्वीकारला आहे़७ जूनच्या मुहूर्तावर मुंबईत दाखल झालेल्या पावसाने आत्तापर्यंत सात टक्के हजेरी लावली आहे़ यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़ मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्ये आजच्या घडीला ५० दिवसांचा जलसाठा आहे़ मात्र गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात उशीरा हजेरी लावणाऱ्या पावसाने काही दिवसांतच वर्षभराचा जलसाठा भरुन काढला होता़ या रेकॉर्ड ब्रेक जलसाठ्याने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला़ त्यानुसार आजच्या घडीला तलावात असलेला एकूण जलसाठा जून २०११ मधील साठ्याच्या तुलनेत हजारो दशलक्ष लीटर्सने अधिक आहे़ त्यामुळे आणखी महिनाभर पावसाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलावकमाल किमान आजआज पाऊसअ. वैतरणा ६०३़५१५९४़४४५९२़१११३मोडक सागर १६३़१५१४३़२६१५३़२१५८तानसा१२८़६३११८़८७११९़८२३५विहार८०़१२७३़९२७४़१५४़६तुळशी१३९़१७१३१़०७१३३़८६१६भातसा१४२़०७१०४़९०१०६़७७३९म. वैतरणा २८५़००२२०़००२६७़४०१६(दशलक्ष लीटर्समध्ये)पाच वर्षांमध्ये १६ जून रोजी तलावांमध्ये असलेला जलसाठावर्षजलसाठा २०१५ १८९०६०२०१४१६८७८१२०१३१७२४७७२०१२७००६१२०१११६५८०४(दशलक्ष लीटर्समध्ये)
मुंबईच्या तलाव क्षेत्रात पावसाची दांडी
By admin | Published: June 17, 2015 2:51 AM