तंत्रशिक्षण मंडळाची कारवाई : पूर्ण किंवा अंशत: संलग्नता रद्दनागपूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ठरविलेल्या मानकांनुसार सुमार कामगिरी करणाऱ्या तंत्रनिकेतन महाविद्यालयांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. मंडळाने २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ३४ तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संलग्नता पूर्णत: किंवा अभ्यासक्रमनिहाय अंशत: रद्द केली आहे. यात विदर्भातील १२ तंत्रनिकेतन संस्थांचा समावेश आहे. या महाविद्यालयांना संबंधित अभ्यासक्रमांमध्ये चालू शैक्षणिक वर्षाकरिता प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश देता येणार नाहीत असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ठरवून देण्यात आलेल्या मानकांनुसार राज्यातील तंत्रनिकेतन संस्थांची उत्कृष्ट, अतिशय चांगली, चांगली, समाधानकारक व सुमार अशा पाच दर्जात वर्गवारी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी मंडळाकडे येत होत्या. मंडळाने राज्यातील संस्थांची सखोल तपासणी केली व राज्यातील ३४ तंत्रनिकेतन महाविद्यालयांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे आढळून आले. यात विदर्भातील १२ तर नागपुरातील ५ संस्थांचा समावेश आहे. मंडळाच्या कलम ३२ अन्वये या संस्थांची संलग्नता अंशत: किंवा पूर्णत: रद्द करण्यात आली आहे. २०१३-१४ या सालात ज्या संस्थांमधील अभ्यासक्रमांना सुमार असा शेरा मिळाला होता, त्या संस्थांच्या व्यवस्थापनास कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. संबंधित संस्थांच्या अध्यक्ष व प्राचार्यांना २० ते २१ मे या कालावधीत मंडळाच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. बहुतांश संस्थांनी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्रुटी दूर करण्याचे हमीपत्र दिले होते. या संस्थांमध्ये परत तपासणी समिती पाठविण्यात आली. ज्या संस्थांनी त्रुटींची पूर्तता केली नाही त्या संस्थांची पूर्णत: किंवा अंशत: संलग्नता रद्द करण्यात आली आहे. यात औरंगाबाद विभागातील १६ , नागपूर विभागातील १२, पुण्यातील ५ तर मुंबई विभागातील एका संस्थेचा समावेश आहे. या संस्थांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.नागपूर विभागातील संस्थांची यादीसंस्था जिल्हासंलग्नता रद्द केलेले अभ्यासक्रमसंजीव स्मृती इन्स्टिट्यूट आॅफ डीएमएलटी वर्धा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ड्रेस डिझाईनिंगइंगोले इन्स्टिट्यूट आॅफ प्रिटिंग टेक्नॉलॉजी नागपूर प्रिटिंग टेक्नॉलॉजीइन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेन्ट अॅन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी नागपूर हॉटेल मॅनेजमेन्टअग्निहोत्री पॉलिटेक्निक वर्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींगभाऊसाहेब मुळक पॉलिटेक्निक नागपूर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींगश्री मुकुंदराव पन्नासे पॉलिटेक्निक नागपूर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींगपुलगाव पॉलिटेक्निक वर्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींगबाबूलालजी अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी वर्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींगओम पॉलिटेक्निक नागपूर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीश्री व्यंकटेश पॉलिटेक्निक वर्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगसम्राट सेवकभाऊ वाघाये पाटील पॉलिटेक्निक भंडारा इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरींगराजश्री शाहू पॉलिटेक्निक बुलडाणामेकॅनिकल इंजिनीअरींग, इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग
तंत्रनिकेतन महाविद्यालयांना दणका
By admin | Published: July 09, 2014 1:10 AM