दौंड : येथील नगरमोरीच्या मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, या धोकादायक खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघात झाले असून, भविष्यात मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तरी सदरचा खड्डा तातडीने बुजविण्यात यावा, अशी मागणी प्रवासी आणि या भागातील रहिवासी यांच्यातून होत आहे. हा रस्ता हा वर्दळीचा असून, श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जाण्यासाठी वाहनांची आणि नागरिकांची गर्दी असते. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समिती, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, दारू उत्पादन शुल्क, नोंदणी कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय याच परिसरात असल्याने या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. रात्रीच्या वेळेला याठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना खड्डा दिसून येत नाही. त्यामुळे काही नागरिक या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. तर, या खड्ड्यात सातत्याने पाण्याचे डबके साचलेले असते. तरी संबंधित खात्याने या रस्त्यावरील खड्डा तातडीने बुजविणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
दौंडला मुख्य रस्त्यावर धोकादायक खड्डा
By admin | Published: May 20, 2016 2:16 AM