ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - सत्तेतून बाहेर पडलो तर फरक पडणार नाही. भाजपाच्या आधी मध्यवधी निवडणुकीला आम्ही तयार आहोत. जर सरकारला मध्यावधी निवडणुका नको असतील, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. सत्तेतून बाहेर पडायला फारसा वेळ लागणार नाही. कोणत्याही प्रश्नावर बोललं तर भाजपला राग येते असेल, तर तसं त्यांनी बोलावं असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा सरकारचा गळा दाबायला वेळ लागणार नाही, हा आमचा इशाराच आहे असे समजा असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टिका केली. आयबीएन लोकमतच्या चर्चा सत्रात ते सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांकडून फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण केल जात आहे. मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांमध्ये फूट पाडली असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. राजकीय कार्यकर्ता हा शेतकरी नसतो का ? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले सरसंघचालकाचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करुन आम्ही भाजपावर कोणताही दबाव आणत नाही. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत नाही, जर अर्ज भरला तर पाहू असे म्हणतं त्यांनी सावध भूमिका घेतली.
मुख्यमंत्र्यांकडून फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण - संजय राऊत
By admin | Published: June 09, 2017 6:03 PM