चेतन ननावरे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबईसह नवी मुंबईवर धुक्याची चादर पसरल्याचे चित्र आहे. मात्र हे धुके नसून धुरकं म्हणजेच प्रदुषणाची चादर असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. वाढते प्रदुषक आणि धुळीकरण याचा हा परिणाम आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तास वातावरण ढगाळ राहील. मळभ आले असून प्रदुषक आणि धुळीकरण हवेवर स्वार झाले आहे. त्यामुळे ही धुक्याची चादर नसून धुरके पसरलेले आहे.
धुसर वातावरणामुळे वाहन चालकांनी वाहने सावकाश चालवावीत. तर श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. या प्रदुषकांमुळे घशाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.