शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

गटारे तुंबल्याने आरोग्य धोक्यात

By admin | Published: June 27, 2016 1:21 AM

बारामती-राशिन मार्गावरील तक्रारवाडी गावातील गटारे तुंबल्याने डासांची वाढ झाली आहे.

भिगवण : बारामती-राशिन मार्गावरील तक्रारवाडी गावातील गटारे तुंबल्याने डासांची वाढ झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारीच गटार तुंबले आहे. डासांबरोबरच दुर्गंधीदेखील वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बारामती-राशिन रोडवरील तक्रारवाडी गावातील गटारी तुंबल्याने गावात डासांची पैदास वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारीच गटारी असून आरोग्य सुधारणा होण्यासाठी आलेल्या रुग्णाला डास चावून आणखीनच आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.तक्रारवाडी हे गाव १०० टक्के भूमिगत गटार योजनेने समृद्ध झालेले आहे. याचे पाणी नैसर्गिक उताराच्या दिशेने गावाबाहेर सोडलेले आहे. बारामती-राशिन रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील पुलातून वाहणारे पाणी नळीत असणाऱ्या दगड धोंड्यामुळे गावाच्या बाजूला साचले आहे. याची मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नागरिक डास आणि दुर्गंधीमुळे हैराण झालेले आहेत. ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याशी पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)खासगी पाइपलाइनचा अडथळापावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे सावर्जनिक बांधकाम विभागाचे सेवक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वास्तविक पाहता या पाणी वाहून जाण्याच्या पाईपमधून पाणी जाण्याऐवजी खासगी लोकांच्या पाइपलाइन गेलेल्या आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यातील पाइपलाइन काढून टाकणे गरजेचे आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यकारिणीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात संपर्क साधून कारवाईबाबत विचारले असता गटार उपसण्याची यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर यावर काम केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.