शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

घराणेशाहीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 1:52 AM

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घराणेशाहीचे राजकारण रुजू लागले होते.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घराणेशाहीचे राजकारण रुजू लागले होते. घरात सत्ता खेळवत ठेवण्याचे नेत्यांचे स्वप्न मतदार राजाने धुळीस मिळविले आहे. पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांनी कुटुंबातील व्यक्तींनाच राजकीय वारसदार म्हणून निवडणुकीत उतरविले होते. मात्र, घराणेशाहीतील ३४ पैकी तब्बल २५ उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे. त्याचवेळी मतदार राजाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात गाववाले, बाहेरवाले हे राजकारण आणि गावकी-भावकी, घराणेशाहीचे राजकारण रुजले आहे. कुटुंबातच सत्ता राहावी, असा अट्टहास नेत्यांचा राहिला आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. महापालिकेत ५० टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर पदाधिकारी, नगरसेवकांनी कुटुंबातील महिलांना उमेदवारी दिली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत उद्योगनगरीतील राजकीय नेत्यांनी घराणेशाहीस प्राधान्य दिल्याचे चित्र होते. मुलगा, मुलगी, आई, पत्नी, भाऊ, भावजय, चुलतभाऊ, मावसभाऊ यांना उमेदवारी देण्याची खेळी खेळली होती. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारी देताना घराणेशाही जपली होती. मात्र, मतदारांनी मोडीत काढली. (प्रतिनिधी)>राजकीय पदाधिकारी, नेत्यांचे नातेवाईक पराभूत भोसरी विधानसभेतील प्रभाग पाचमधून आमदार महेश लांडगे यांनी बंधू सचिन यांना भाजपपुरस्कृत म्हणून रिंगणात उतरविले. त्याचबरोबर माजी नगरसेवक राजू दुर्गे यांची मुलगी तेजस्विनी, माजी नगरसेवक तानाजी वाल्हेकर यांची पत्नी शोभा, रघुनाथ वाघ यांची पत्नी रजनी, दशरथ लांडगे यांचा चिरंजीव कुणाल, रमण पवार यांचा चिरंजीव संदीप, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे यांची सून दीपिका, माजी नगरसेवक प्रधान कुंजीर यांचा मुलगा कैलास, प्रभाग अठरामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे यांचा चिरंजीव भारत केसरी विजय यांना, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या कोमल साळुंके या प्रभाग आठमधून, नगरसेवक चंद्रकांत वाळके यांची पत्नी कल्पना, जितेंद्र ननावरे यांची पत्नी प्रियंका, स्वीकृत सदस्य हमीद शेख यांच्या मातोश्री मुमताज, तानाजी खाडे यांची भावजय मालन खाडे, माजी नगरसेवकांचा चिरंजीव योगेश गवळी, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड यांची कन्या रमा गायकवाड, माजी नगरसेवक महेश चांदगुडे यांची पत्नी सुप्रिया, विश्वास गजरमल यांची पत्नी वीणा, माजी नगरसेवक शशीकिरण गवळी यांची सूनबाई अनु, राजू लोखंडे यांची पत्नी चंदा, एकनाथ मोटे यांचा चिरंजीव अमोल, विजय लांडे यांची पत्नी वैशाली हे पराभूत झाले.