शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

मंत्र्यांनंतर आता वकील...! म्हणे दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध बनले; दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा खळबळजनक दावा, १२ मार्चपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 06:19 IST

Dattatray Gade Swargate Rape Case: उसाच्या फडात लपला; पाणी पिण्यास बाहेर येताच बेड्या, स्वारगेटचा बलात्कारी दत्तात्रय गाडेच्या मध्यरात्री आवळल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : स्वारगेटमधील बसमध्ये तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या अखेर पोलिसांनी चौथ्या दिवशी आवळल्या. गुनाट (ता. शिरूर) गावाजवळील उसाच्या फडात लपलेला गाडे तहानेने व्याकूळ झाला होता. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पाणी मागण्यासाठी गावात आला असतानाच पोलिस पथकाने झडप घालून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी कडेकोट बंदोबस्तात गाडेला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या परिसरात जवळपास १०० पोलिसांचा बंदोबस्त होता. आरोपीला न्यायालयात आणण्यापूर्वी गेट क्र. ४ च्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि उद्धवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांना पाेलिस वाहनात बसवून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक दोन ड्रोन कॅमेरे (थर्मल इमेजिंग) तसेच श्वान पथकाची मदत घेतली होती. जवळपास ७१ सीसीटीव्ही, ५०० पोलिस अधिकारी-कर्मचारी गावात तळ ठोकून होते.

ग्रामस्थांना एक लाखाचे बक्षीसगाडेला पकडण्यात गुनाट गावातील ग्रामस्थांची मोठी मदत झाली. पोलिसांना बरोबर घेऊन ग्रामस्थांनी दुचाकीद्वारे गस्त घातली. उसाच्या फडात शिरणे साेपे नसते. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस फडात शिरले. चोहोबाजूंनी वेढा घालण्यात आला. मध्यरात्री गाडे आडवाटेने बाहेर पडल्याची माहिती एका ग्रामस्थाने दिली. त्या ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला. त्याला पोलिसांकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 

आराेपीचा दाेनदा आत्महत्येचा प्रयत्न?आरोपी दत्तात्रय गाडे हा आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे कीटकनाशकाची बाटली सापडल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पोलिस आयुक्त म्हणाले, ‘गाडे आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता, याबाबत आता ठोस सांगणे चुकीचे आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गाडेला ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याच्या गळ्यावर खरचटण्याच्या आणि दोरीने आवळण्याच्या खुणा आढळल्या. वैद्यकीय तपासणी अहवालात याबाबतच्या गोष्टी स्पष्ट होतील.’

शक्ती कायद्याचा फेरआढावा घेणारमुंबई : पुण्यातील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याचा राज्य सरकार फेरआढावा घेणार असल्याचे आणि सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर असल्याचे शुक्रवारी सांगितले. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानांबाबत विचारले असता ते म्हणाले की, कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. ते नवीन आहेत. माझा त्यांना सल्ला राहील की संवेदनशीलतेने बोलले पाहिजे. मंत्र्यांनी बोलताना चूक केली तर समाजमनावर परिणाम होतो. 

संमतीने संबंध : आरोपीचे वकीलगाडेच्या वकिलांनी दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा न्यायालयात केला, तर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी हा सराईत आहे. घटना घडल्यानंतर आरोपीला कुणी आसरा दिला? यासह आरोपीची वैद्यकीय चाचणी व मोबाइल जप्त करायचा असल्याने आरोपीला चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी आरोपीला १२ मार्चपर्यंत कोठडी सुनावली.

दत्तात्रय गाडे याला कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही स्ट्राँग केस करणार आहोत. भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. विशेष सरकारी वकिलांंची नियुक्ती, तसेच खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, याबाबत शासनाकडे विनंती करण्यात येईल. अमितेश कुमार, पो. आयुक्त 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीswargate bus depotस्वारगेट बसस्थानकCourtन्यायालय