मुंबई : रुपयाचे अवमूल्यन आणि कोसळत्या शेअर बाजारामुळे ग्राहकांनी मोठ्या संख्येने दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरविल्याने, गुरुवारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाच्या मुहूर्तावर सोनेखरेदीत २० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता, मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी वर्तविली.जैन म्हणाले की, घसरत्या रुपयामुळे शेअर बाजारात निराशेचे वातावरण आहे. मात्र, त्याचा परिणाम सोेनेखरेदीवर दिसत आहे. नवरात्रीत मोठ्या संख्येने लग्नसमारंभात लागणाºया दागिन्यांची आॅर्डर देणाºया ग्राहकांची संख्या यंदा लक्षणीय होती. महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या काही काळात ३० हजार रुपये प्रति तोळा दरात असलेल्या सोन्यानेही आता उचल खाण्यास सुरुवात केली आहे. वस्तू व सेवा करासह सोन्याची प्रति तोळा किंमत बुधवारी ३२ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने दिवाळीपर्यंत प्रतितोळे सोन्यासाठी ग्राहकांना किमान ३३ हजार रुपये मोजावे लागतील, यात शंका नाही.सराफांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी केंद्र शासनाने केवायसीच्या रूपात आणलेल्या जाचक तरतुदीमुळे सोनेखरेदी थंडावली होती. मात्र, यंदा कोणतीची अडचण नसल्याने ग्राहकांनी मोठ्या संख्येने दागिन्यांचे बुकिंग केलेली आहे. यात बांगड्यांपासून कुंदन, वेलंदी अशा पारंपरिक दागिन्यांचा समावेश आहे. गळ्यातील हार आणि कर्णफुलांनाही ग्राहकांचीअधिक पसंती मिळत आहे. किमान ५ तोळ्यांपासून कमाल ३० तोळ्यांपर्यंतचे हे सेट असतात.बाइकहून स्कूटरला अधिक मागणीबहुपयोगी प्रकारामुळे बाइकहून अधिक मागणी स्कूटरला असल्याचे चित्र बाजारात दिसते. महिला व पुरुष असे दोन्ही गट स्कूटर सहज चालवू शकत असल्याने, शहरांसह ग्रामीण भागांमध्येही बाइकच्या तुलनेत स्कूटरला अधिक पसंती मिळत असल्याचे सर्वेक्षणात समोर आल्याची माहिती, एका खासगी कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यादविंदर सिंग गुलेरिया यांनी दिली. बहुतेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या आॅफर दिल्या आहेत, तर काहींनी अधिक सेवा देण्यावर भर दिल्याचे गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला येणार उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:50 AM