शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

मृत्यूच्या कुशीत दशरथनगर !

By admin | Published: August 05, 2014 1:09 AM

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे.

भूस्खलनाचा धोका माळीण होणार का? नागरिकांचा जीव मुठीत आनंद डेकाटे/ जीवन रामावत -नागपूरपुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे. पहाडाच्या लागून वसलेले माळीण हे राज्यातील किंवा देशातील एकमेव गाव नव्हे तर अशी अनेक गावे आजही धोकादायक स्थितीत आहेत. नागपूर शहरातसुद्धा अशा काही वस्त्या आहेत ज्या पहाडाखाली, पहाडाला लागून वसल्या आहेत. लोकमत चमुने सोमवारी या वस्त्यांची पाहणी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गिट्टीखदान परिसरातील दशरथनगर व कुतुबशहानगर या अशाच धोकादायक वस्त्या असून यांचे कधी ‘माळीण’ होईल, काही सांगता येत नाही. छतावरचे प्लॅस्टरही तुटून पडले दशरथनगरात टेकडीवरून दगड पडणे नवीन नाही. एकदा टेकडीवरून एक मोठा दगड कोसळून लोखंडे यांच्या घरावर पडला. त्यामुळे सिमेटंच्या छताचे प्लॅस्टर तुटून त्यांच्या स्वयंपाक करण्याच्या ओट्यावर पडल्याने ते तुटले. आजही तुटलेले प्लॅस्टर तसेच आहे. तरुण मुलाचा गेला जीव दशरथनगर येथे राहणारे कांता तायडे यांचा १८ वर्षाचा तरुण मुलगा महेश हा एकेदिवशी पतंग उडविण्यासाठी घरामागच्या टेकडीवर चढला. पतंग उडविताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला. त्याची आठवण सांगताना त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यात आजही अश्रू दाटून येतात. शौचालयाचे छप्पर तुटले दगड नेहमीच पडत असतात परंतु येथील शाहू यांच्या घरावर एक मोठा दगड पडल्याने त्यांचे छप्पर तुटले. रात्री ११ वाजताच्या सुमारास धो धो पाऊस पडत असताना अचानक दगड पडला. तेव्हा मोठा आवाज झाला. आकाश कोसळले की काय असे वाटू लागले. त्या घटनेपासून शाहू कुटुंबीय पावसाळा आला की दहशतीतच असतात. वर दरड तर खाली दलदलदशरथनगरातील नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. वरून दरड कोसळण्याची भीती आहे तर खाली वस्तीत दलदल आहे. एकेकाळी येथे एक छोटे सरोवर होते. पहाडावरून वाहत येणारे पाणी येथे साचायचे. आज सरोवराच्या आजूबाजूला घरे झाली आहेत. वरच्या पाण्यासोबतच नागरिकांच्या वापराचे पाणीही सरोवरात सोडले गेले. परिणामी सरोवर दूषित झाले. आज या सरोवरात गवत वापले असून दलदल तयार झाली आहे. खेळता खेळता त्यात कुणी पडले तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.