ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महापालिका निवडणूकांची तारीख आज जाहीर होणार आहे. आज दुपारी चारच्या सुमारास राज्य निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद घेण्यात येणार असून त्यावेळी १० महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील असे समजते.
मुंबईसह राज्यात १० महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून दोन्ही निवडणुका एकाच दिवशी घेण्यात येतील असे समजते.
दरम्यान, महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच होतील असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्याने त्यापूर्वीच निवडणुका घेण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले होते.
विशेष म्हणजे निवडणुकांचे पडघम वाजू लागले असले तरीही तरी शिवसेना- भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती-आघाडीबाबत कोठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.
१० महापालिका
१) मुंबई २) पुणे ३) पिंपरी चिंचवड ४) ठाणे ५) उल्हासनगर ६) नाशिक ७) नागपूर ८) अकोला ९) अमरावती १०) सोलापूर
२६ जिल्हा परिषद
१) रायगड २) रत्नागिरी ३) सिंधुदुर्ग ४) पुणे ५) सातारा ६) सांगली ७) सोलापूर ८) कोल्हापूर ९) नाशिक १०) जळगाव
११) अहमदनगर १२) अमरावती १३) बुलढाणा १४) यवतमाळ १५) औरंगाबाद १६) जालना १७) परभणी १८) हिंगोली
१९) बीड २०) नांदेड २१) उस्मानाबाद २२) लातूर २३) नागपूर २४) वर्धा २५) चंद्रपूर २६) गडचिरोली