ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पत्नी व मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मावळ तालुक्यातील कान्हे गावातील ही धक्कादायक घटना आहे. तसंच मुलगी व आणखी एका व्यक्तीवरदेखील धारदार शस्त्रानं वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली आहे. याप्रकरणी आरोपी वसंत सातकरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
रविवारी ( 9 जुलै ) मध्यरात्री ही घटना घडली. मृतांची नावं रजनी सातकर ( वय 38 वर्ष) व अनुष सातकर ( वय 13 वर्ष ) अशी आहेत. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी आरोपी वसंत सातकरला ताब्यात घेतले आहे.
अनैतिक संबंधांच्या संशयावरुन वसंत सातकरनं आपल्या पत्नीमुलाची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मुलगी श्रावणी व आणखी एकावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. जखमी श्रावणीवर तळेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.