ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाण्यातील बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याकरिता तीन ते चार नगरसेवक व बडे नेते यांनी मदत केल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व नेते यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.ठाण्यातील एका बिल्डरकडे कासकर याने चार फ्लॅटची मागणी केली होती. मागणी पूर्ण केल्यानंतरही कासकरची हाव वाढल्याने त्या बिल्डरने ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सोमवारी रात्री कासकरला अटक करण्यात आली. मंगळवारी ठाणे न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली.कासकरने आपल्याला तीन ते चार नगरसेवक व राजकीय नेत्यांनी खंडणी वसुलीकरिता सहकार्य केल्याची कबुली दिल्याने दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्या प्रकरणात चार नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली होती. कासकर प्रकरणामुळे पुन्हा एकदा काही राजकीय पक्ष व नगरसेवक वादाच्या भोवºयात सापडले आहेत. परमार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नगरसेवकांना अटक झाली होती.>चौकशीसाठी बोलावणारयेत्या काही दिवसांत पोलिसांकडून संशयाच्या भोव-यात असलेल्या नगरसेवकांना चौकशीकरिता बोलावले जाणार आहे. कासकर व नगरसेवक यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यताआहे. खंडणीच्या रूपाने गोळा केलेली रक्कम हवालामार्गे विदेशात धाडली किंवा कसे या दृष्टीनेही चौकशी करण्यात येणार आहे.
दाऊदच्या भावाचे राजकीय लागेबांधे!, इक्बाल कासकरची कबुली, चौघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 7:09 AM