शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

गोडव्याच्या दिनी राज्यात ६३२ पक्ष्यांवर ‘संक्रांत! बंदी असताना चिनी, नायलॉन मांजाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 2:52 AM

राज्यभरात ५२८ पक्षी जखमी, तर १०४ पक्ष्यांचा मृत्यू

औरंगाबाद : तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देण्याचा मकरसंक्रांतीचा दिवस राज्यातील तब्बल ६३२ पक्ष्यांसाठी मात्र ‘संक्रांती’चा ठरला. ‘लोकमत’ पर्यावरण डेस्कला मिळालेल्या माहितीनुसार घातक मांजामुळे राज्यात बुधवारी ५२८ पक्षी व १६ प्राणी जखमी झाले, तर १०४ पक्ष्यांना जीव गमवावा लागला. अनेक पक्ष्यांचे पंख कापले, तर काहींचे पाय कापले गेले.

राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर आणि अकोला, अशा ११ शहरांमधील ही आकडेवारी आहे. चिनी व नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही बुधवारी अनेक शहरांमध्ये पतंग उडविण्यासाठी याचा वापर केला गेला. हा मांजा घातक असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. २०१५ साली एका जनहित याचिकेनंतर कोर्टाने या मांजावर बंदी घातली. २०१८ साली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने काचेचे लेपन असलेल्या नायलॉन, तंगूसच्या उत्पादनासह विक्रीवर बंदी घातली. मात्र, या मांजाची विक्री काही थांबली नाही.

सर्वाधिक ४२० पक्षी मुंबई परिसरात, तर पुण्यात अंदाजे २२ पक्षी जखमी झाले. उद्या यात आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती पक्षीमित्र संतोष थोरात यांनी दिली. औरंगाबादेत दिवसभरात दोन पक्षी जखमी झाल्याची माहिती पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली. जळगावमध्ये ३, अकोल्यात ५ पक्षी जखमी झाले. त्यातील एक बगळा व कबुतराचा मृत्यू झाला. इतर पक्षांवर यशस्वी उपचार केल्याची माहिती डॉ. मंजूळकर यांनी दिली.

कोल्हापुरात दिवसात ५ घार आणि एक कावळा जायबंदी झाले. या पक्ष्यांवर पांजरपोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले जात आहेत. नाशिकमध्ये एक कबुतर आणि एक वटवाघूळ मरण पावले. इतर २८ पक्षी जखमी झाले. यात १९ कबुतर, २ कोकीळ, एक घार, चार घुबड, एक साळुंखी, एका चिमणीचा समावेश आहे.

अहमदनगर, सातारा, सोलापुरात एकही नोंद नाहीराज्यात अनेक शहरांत बुधवारी पक्षी जखमी झाल्याची नोंद असली तरी, अहमदनगर, सातारा आणि सोलापूरमध्ये मात्र तशी कुठलीही घटना नोंद झाली नाही. सोलापुरात गणेशोत्सवानंतर दसऱ्यापर्यंत पतंग उडविल्या जातात.पतंगबाजीत एकाचा बळी; दोघे गंभीर जखमीनाशिक/अहमदनगर: कटलेला पतंग पकडण्याच्या नादात पाय घसरुन विहिरीत पडल्याने बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नाशिक जिल्ह्यात सिन्नरजवळील मापारवाडी येथे घडली.दुसºया घटनेत औरंगाबाद येथे पतंगाच्या मांजाने एका लष्करी जवानाचा गळा श्वासनलिकेपर्यंत चिरल्याने जवान गंभीर जखमी झाला. जवानावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच नगर-मनमाड रोडवरुन मोटारसायकलवरून जात असताना बोल्हेगाव परिसरात मांजा अडकल्याने एका तरुणाच्या हनुवटीखालील भाग कापला जाऊन तब्बल ३२ टाके पडले़सर्वाधिक मुंबईतसर्वाधिक ४२० पक्षी मुंबई परिसरात जखमी झाले. दक्षिण मुंबईत १५२, वांद्रे ते दहिसर परिसरात १७९, नवी मुंबई परिसरात ८९ पक्षी जखमी झाले. दक्षिण मुंबईत ५, उपनगरात ८ आणि नवी मुंबईत ३ प्राणी जखमी झाल्याची माहिती अहिंसा संघाने दिली. जखमी पक्षी, प्राण्यांवर या संघाकडून उपचार केले जातात.

टॅग्स :kiteपतंग