पिंपरी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी पिंपरीतील बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी करण्यास सुरूवात केली आहे़ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण दिसत आहे. पिंपरीतील कँम्प परिसरातील कपड्यांच्या दुकानात, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक दुकान, तसेच फ राळ बनविण्यासाठी किराणा माल खरेदीसाठी ग्राहकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आढळून येत आहे़ किराणा माल दुकानादारांनी ग्राहकांना विक्री करण्यासाठी खोबरे, रवा, तेल, तूप, चिवड्याच्या मालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ठेवली आहे़ विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे मुलांच्या कपड्यांच्या व फ टाका दुकानात गर्दी होत आहे.फर्निचर दुकानात विविध कलागुणांनी बनविलेले पलंग, सोफ ासेट, लाकडी खुर्च्यां नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत़ गेल्या वर्षीच्या तुलनेत फ र्निचरच्या वस्तूंना मागणी वाढल्याने दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे़ तसेच इलेक्ट्रॉनिक दुकानात विविध उपकरणांनी ग्राहकाला भुरळ पाडण्यास भाग पाडत आहेत़ स्वयंपाक करण्याची यंत्रे, साउंड सिस्टीम, फ्रिज, मिक्सर यांच्या खरेदीवर आर्कषक सुट देऊन ग्राहकांना खूष करण्याचा प्रयत्न अनेक दुकानदारांनी केला आहे़ कँम्पमधील संत गाडगे महाराज चौकातील अनेक दुकानात फॅ शनेबल चप्पल, कपटे, बुट, कपड्यांची रेलचेल झाली आहे़ वस्तंूची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी दुकानाबाहेर फ लक लावून दुकानदारांनी जाहिरात केली आहे़ अनेक दुकानात भारतीय बनावटीच्या प्रकाश कंदीलाची मांडणी करण्यात आली आहे़ दुकानाबाहेर विविध रंगातील कंदीलांनी ग्राहकांना भुरळ पाडली आहे़ (प्रतिनिधी)>बाजारपेठांत गर्दीचा महापूरयंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच चायनीज वस्तूंना ग्राहकांची काहीच मागणी नसल्याची माहिती अनेक दुकानदारांनी दिली़ भारतीय बनावटीचे कंदील बाजारात आल्यामुळे महिला वर्ग त्यास पसंती देत आहेत़ आकाश कंदिलाचे दर १०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत आहेत़ विविध रंगातील कापडी, प्लॅस्टिक, तसेच रेडिमेड कापड, बास्केट जाळी कापड लावलेल्या कंदिलांना मागणी वाढत असल्याचे दुकानदार जयकुमार वनवारी यांनी सांगितले़ वेगवेगळ्या रंगातील मेणबत्त्या, आकाश कंदील, कपडे, सौंदर्यप्रसाधनाचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य यामुळे पिंपरी कॅ म्पमधील बाजारपेठेला रोषणाई मिळाली आहे़ >चिनी वस्तूंना ग्राहकांची नापसंतीगेल्या काही वर्षांपासून दिवाळीसाठी चायनीज वस्तूंची मोठी खरेदी होत असल्याने, व्यापारी वर्गाने चायनीज वस्तंूचा मोठा माल खरेदी केला होता़ मात्र यंदा स्वदेशाचा नारा देत योगगुरू रामदेव बाबांनी चायनीज वस्तूंना हद्दपार करण्याचे आवाहन केले होते़ त्यानुसार दिवाळी अवघ्या काही दिवसांवरून आली असतानाही, कोणत्याही दुकानादाराने चायनीज मालाची खरेदी केली नसल्याचे सांगितले़
दिवाळीसाठी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2016 1:36 AM