Maharashtra Financial Audit Report: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ९ मार्च रोजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी, राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केला. या अहवालात राज्याच्या अर्थव्यवस्थेत ६.७ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
सन 2022-23च्या पुर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्के वाढ अपेक्षित आहे. सन 2022-23मध्ये राज्याच्या कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्के, उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित आहे.
पूर्वानुमानानुसार सन 2022-23 मध्ये सांकेतिक (नॉमिनल) (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 35,27,084 कोटी अपेक्षित आहे आणि वास्तविक (रिअल) (सन 2011-12च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 21,65,558 कोटी अपेक्षित आहे. पहिल्या सुधारित अंदाजांनुसार सन 2021-22 चे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 31,08,022 कोटी होते, तर सन 2020-21मध्ये ते 26,27,542 कोटी होते. सन 2021- 22चे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 20,27,971 कोटी होते, तर सन 2020-21 मध्ये ते 18,58,370 कोटी होते. सन 2021-22 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 2,15,233 होते, तर सन 2020-21 मध्ये ते 1,83,704 होते.
एप्रिल ते डिसेंबर, 2022 या कालावधीत ग्रामीण व नागरी भागाकरिता सरासरी ग्राहक किंमती निर्देशांक अनुक्रमे 3490 व 3333 होता कोविड 19 महामारीच्या निर्बंधामुळे एप्रिल 2021 करिता जीवनावश्यक वस्तुच्या किमती संकलनात अडचणी आल्या आणि खाद्यपदार्थ गाव्यतिरिक्त इतर गटातीत वस्तुच्या किंमती उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे 2021-22 करिता मे, 2021 ते मार्च 2022 या कालावधीकरिता ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यात आता मे ते डिसेंबर 2022 या कालावधीत ग्रामीण व नागरी भागाकरिता सरासरी ग्राहक किंमती निर्देशांक अनुक्रमे 350 8 व 3344] होता आणि मे ते डिसेंबर 2022 या कालावधीत सरासरी ग्राहक किंमती निर्देशांकावर आधारित वर्ष वर्ष चलनवाढ ग्रामीण भागाकरिता 8 टक्के व नागरी भागाकरिता 7.3 टक्के होती, असे यात नमूद करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23करिता राज्याचा महसुली खर्च 4,27,280 कोटी अपेक्षित असून सुधारित अंदाजानुसार सन 2021- 22 करिता 3.92.857 कोटी आहे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा 26.5 टक्के अपेक्षित असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा 220 टक्के अपेक्षित आहे. सन 2022-23करिता राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक कर्ज आराखडा 5.22 लाख कोटी असून त्यामध्ये कृषि व संलग्न कार्य क्षेत्राचा हिस्सा 24.1 टक्के आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचा हिस्सा 54.5 टक्के आहे राज्यात मान्सून 2022 मध्ये सरासरी पावसाच्या 198 टक्के पाऊस पडता राज्यातील 204 तालुक्यांमध्ये अतिरिक्त 145 तालुक्यांमध्ये सरासरी आणि सहा तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला असेही या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.
अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23 करिता राज्याची महसुली जमा 4,03,427 कोटी, तर सुधारित अंदाजानुसार सन 2021-22 करिता 3,62,133 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-23करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे 3,08,113 कोटी आणि 95,374 कोटी आहे. माहे एचित ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा 2.51,924 कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 62.4 टक्के) आहे.
सन 2022-25 ऑक्टोबरपर्यंत विजेची सरासरी कमाल मागणी 22.339 मेगावॅट होती तर पुरवठा 22.441 मेगावट होता. सन 2021- 22मध्ये विजेची सरासरी कमाल मागणी 21.221 मेगावॅट होती तर पुरवठा 21,750 मेगार होता. राज्यातील रस्त्यावरील वाहनांची संख्या दि. 1 जानेवारी, 2023 रोजी 433 लाख (134 वाहने प्रति किमी रस्ता लांबी) होती, तर दि. 1 जानेवारी, 2022 रोजी 409 लाख (128 वाहने प्रति किमी रस्ता लांबी) होती, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
सन 2022-23च्या खरीप हंगामामध्ये 157.97 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, तेलबिया कापूस ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे 10 टक्के, 19 टक्के, पाच टक्के व चार टक्के वाढ अपेक्षित असून कडधान्याच्या उत्पादनात 37 टक्के घट अपेक्षित आहे. सन 2022-25च्या रब्बी हंगामामध्ये 57.74 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनात 34 टक्के वाढ अपेक्षित असून तृणधान्ये व तेलबियांच्या उत्पादनात प्रत्येकी 13 टक्के घट अपेक्षित आहे. सन 2021-22मध्ये फलोत्पादन पिकाखालील क्षेत्र 23.92 लाख हेक्टर असून 527.84 लाख मे. टन उत्पादन अपेक्षित आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"