ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 22 - तालुक्यातील नगाव येथील डी़डी़सी़सी बँकेच्या शाखेतून अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून ८८ हजार २७० रूपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.धुळे व नंदुबार जिल्हा सहकारी बँकेची (डी़डी़सी़सी) नगाव येथे मुंबई- आग्रा महामार्गालगत शाखा आहे़ २१ रोजी रात्री दहा ते २२ जुलै रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पुढील गेट व आतील लाकडी गेटचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. बँकेतील लोखंडी तिजोरीचे हॅण्डल तोडून त्यातील ८८ हजार २७० रूपये रोख चोरून नेले. याबाबत बँकेचे शाखाधिकारी चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी करत आहेत.
शिपाईच्या लक्षात आली घटनाशुक्रवारी सकाळी दहा वाजता बँकेचा शिपाई आला असता त्याला बँकेचे कुलूप तुटलेले दिसून आले़ त्याने बँकेच्या शाखाधिकारी चंद्रकांत तुकाराम पाटील (रा़ नगाव) यांना माहिती दिली़ त्यांनी तात्काळ बँकेत येऊन पाहणी केली़ तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यांनंतर घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना देण्यात आली़.
अधिकाऱ्यांची भेटअपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक हिंमत जाधव, पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी यांनी बँक शाखेला भेट देऊन पाहणी केली़.