मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्यातील क्रमांक १ चे दैनिक असलेल्या लोकमतर्फे आयोजित चौथ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आॅनलाईन प्रवेशिका आता १७ मार्च २०१७ पर्यंत पाठविता येतील. त्यामुळे व्यक्तिगत माहितीसह झोन निवडून क्लासिकल अथवा पॉप्युलरपैकी एक प्रकार निश्चित करून आपल्या प्रवेशिका जास्तीत जात संख्येने तत्काळ अपलोड कराव्यात, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. गेल्या आठ दिवसांत महाराष्ट्रभरातून असंख्य कलाकारांनी वेबसाईटवर नोंदणी करून प्रवेशिका पाठविल्या आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना आपले आॅडिओ आणि व्हिडीओ ६६६.२४१्न८ङ्म३२ल्लं.ङ्म१ॅ या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. नागपुरात २५ मार्च रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते एक लक्ष रुपये सन्मान निधी, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून लोकमत संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मानासोबतच या क्षेत्रातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ प्रदान करीत असते. यंदा या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन प्रवेशिका पाठविण्याची पद्धत- जास्तीत जास्त पाच मिनिटे कालावधीची आपली प्रवेशिका आॅडिओ अथवा व्हिडिओ या कोणत्याही एका माध्यमात तयार करा. - प्रवेशिका आॅनलाईन अपलोड करण्यासाठी ६६६.२४१्न८ङ्म३२ल्लं.ङ्म१ॅ या संकेतस्थळास भेट द्या. - ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कारासंबंधीची सर्व माहिती व्यवस्थित वाचा. - प्रवेशिका अपलोड करण्यासाठी ‘सबमिट’वर क्लिक करा. - व्यक्तिगत माहितीसह झोन निवडून ‘क्लासिकल’ अथवा ‘पॉप्युलर’पैकी एक प्रकार निश्चित करून आपली प्रवेशिका अपलोड करा. - नियम व अटी चौकटीत क्लिक करा आणि सबमिट बटन दाबा. - प्रवेशिका अपलोड करण्याची अंतिम मुदत १७ मार्च २०१७ अशी आहे. असे असेल स्पर्धेचे स्वरूप१ - ही स्पर्धा १५ ते ३० वयोगटातील स्पर्धकांसाठी असेल२ - या संकेतस्थळावर झोननिहाय प्रवेशिका स्वीकारल्या जातील३ - अंतिम फेरीतील स्पर्धकांना नागपुरात २५ मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळयात लाईव्ह परफॉर्मन्सची संधी दिली जाईल.आपल्या सामाजात अनेक कलाकार दडलेले आहेत. योग्य संधी न मिळाल्यामुळे निराश झालेल्या अशा तरूण कलाकारांचा जोश समाज विधायक कामासाठी लागावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. श्रीमती ज्योत्स्रा दर्डा यांच्या संकल्पनेतून नवोदित कलाकारांना संधी देणाऱ्या लोकमतच्या ‘सूर ज्योत्स्ना’चा जन्म झाला त्याच ध्येयाने प्रेरित होऊन उदयोन्मुख कलाकारांमधील कलागुणांना योग्य ती संधी मिळावी या हेतूनेच सपट परिवार चहाने ‘परिवार टी कॅनव्हास’ या मंचाची कल्पना पुढे आणली आहे. - निखिल जोशी, समूह व्यवस्थापकीय संचालक, सपट इंटरनॅशनल प्रॉ.लि.
प्रवेशिका पाठविण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत
By admin | Published: March 11, 2017 12:51 AM