शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

मेळघाटात ११९ बालकांचे मृत्यू

By admin | Published: July 23, 2016 2:28 AM

गेल्या तीन महिन्यांत कुपोषणामुळे उपजतमृत्यूंसह ११९ पालकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बंड्या साने यांनी दिली

मुंबई : मेळघाटात गेल्या तीन महिन्यांत कुपोषणामुळे उपजतमृत्यूंसह ११९ पालकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बंड्या साने यांनी दिली आहे. तरी सरकारने कुपोषणासाठी विशेष धोरण आखण्याची मागणी साने यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.साने म्हणाले की, मेळघाटात आरोग्य केंद्रांची वानवा असून उपलब्ध केंद्रातही पुरेसे डॉक्टर नाहीत. परिणामी २०१५-१६ सालात मेळघाटात कुपोषणामुळे ५२८ बालकांना जीव गमवावा लागला. यामधील उपजत मृत्यूंची संख्या १००हून जास्त आहे. एप्रिल ते जून महिन्यांत १० मातामृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मेळघाटातील कुपोषणमुक्तीसाठी शासनाने तातडीने उपाययोजना आखण्याची गरज आहे. मात्र अद्यापही येथील कुपोषणप्रश्नी सरकार म्हणावे तितके गंभीर नसल्याचे साने यांचे म्हणणे आहे.१९९३ साली विरोधी बाकावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी मेळघाटात जाऊन कुपोषणाची माहिती घेतली होती. प्रश्नाची गंभीरता जाणल्यानंतर फडणवीस यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात सरकारविरोधात याचिकाही दाखल केली. मात्र युतीचे सरकार आल्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा युती सरकारचा सत्तेवरून पायउतार झाला आणि भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आत्तापर्यंत भाजपने कुपोषणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात दोनवेळा याचिका दाखल केली. मात्र गेल्या वीस वर्षांपासून या प्रश्नावर बाजू मांडणारे भाजपचे वकील आत्ता छत्तीसगड महाधिवक्ता म्हणून काम करत आहे. परिणामी गेल्या दोन वर्षांत ते याप्रकरणी होणाऱ्या सुनावणीस सतत गैरहजर राहत आहेत. सत्तेत नसताना कुपोषणाचे राजकारण करत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्यानंतर मात्र चिडीचुप दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>मेळघाटाला दिलासा मिळणार का?राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आत्तापर्यंत मेळघाटाला तीनवेळा भेट दिली. मात्र तरीही येथील कुपोषणाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. याउलट केसरकर यांच्या भेटीनंतर येथील टेलिमेडिसन सेवा बंद झाल्याचे साने यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच कुपोषणाच्या प्रश्नावर विरोधी बाकावर असतानाही दाखवली जाणारी तळमळ, सत्तेवर आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवावी. तसेच विशेष धोरण आखून येथील कुपोषण निर्मूलनाचा ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणीही साने यांनी केली आहे.