शिर्डी : श्री साईबाबांच्या 96व्या पुण्यतिथी उत्सवाला गुरुवारी पहाटे पारंपरिक पद्धतीने व मंगलमय वातावरणात सुरुवात झाली़ पहाटे काकड आरतीनंतर श्री साईंच्या प्रतिमेची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली़
मिरवणूक द्वारकामाईत आल्यानंतर साईसच्चरित्रच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला़ साईसच्चरित्र पारायणामुळे रात्रभर द्वारकामाई मंदिर उघडे ठेवण्यात आल़े द्वारकामाई मंडळाने उभारलेला भव्य प्रवेशद्वाराचा देखावा उत्सवाचे आकर्षण ठरत आह़े शुक्रवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी 9 वाजता शहरात भीक्षा झोळीचा कार्यक्रम होईल. सायंकाळी विजयादशमी निमित्त साईंच्या आगमनाची ओळख असलेल्या खंडोबा मंदिरात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होईल़ रात्री साईंची सुवर्णरथातून मिरवणूक काढण्यात येईल. (प्रतिनिधी)