शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

गोरखपूरच्या इस्पितळातील मुलांचा मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच -  उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 7:45 AM

गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

मुंबई, दि. 14 - गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

''उत्तर प्रदेशात ७० बालकांचे सामुदायिक हत्याकांड घडले आहे व या हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार?'', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  शिवाय, ‘‘यहां तो अगस्त में बच्चे मरतेही है!’’, असे वादग्रस्त विधान करणा-या उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ यांना पदावरुन हटवण्याचीही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

नेमके काय आहे सामना संपादकीय ?उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका वक्तव्यामुळे देशात टीकेची झोड उठवली गेली आहे, पण उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या इस्पितळात ७० बालकांनी तडफडून प्राण सोडले यावर अनेक ‘भोंग्यां’ची वाचा गेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिल्यापासून हुकमत असलेला गोरखपूर जिल्हा आहे. त्या गोरखपुरात बालकांच्या मृत्यूचे हे तांडव म्हणजे माणुसकीला आणि शासनाला कलंक आहे. इस्पितळातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला व ७० मुलांना प्राण गमवावे लागले. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीची बिले वेळेत भरली गेली नाहीत. सरकारने बिले थकवली व ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला. हे असे घडले असेल तर उत्तर प्रदेशात ७० बालकांचे सामुदायिक हत्याकांड घडले आहे व या हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार? हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन एक दिवसावर आला आहे व लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या भाषणाची जय्यत तयारी सुरू असताना उत्तर प्रदेशात बालमृत्यूचे तांडव घडावे हा स्वातंत्र्याचा अपमान आहे. केंद्रातील सत्तापरिवर्तनानंतर सामान्य व गोरगरीबांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येतील अशा आशेची किरणे उगवली होती, पण आजही ग्रामीण भागातील सरकारी इस्पितळात धड औषधे नाहीत, सुविधा नाहीत व ऑक्सिजनसारख्या आवश्यक गोष्टी नाहीत. मग बदलले ते काय? चारेक दिवसांत ७० मुले नक्की कशाने मेली यावर दडपादडपीचे प्रकार सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ निर्लज्जपणे सांगतात, ‘‘यहां तो अगस्त में बच्चे मरतेही है!’’ या भयंकर विधानाबद्दल या मंत्र्यांना ताबडतोब पदावरून दूर करायला हवे. हे मंत्री काँग्रेसचे किंवा यादवांच्या समाजवादी पक्षाचे असते तर त्यांना एव्हाना सुळावर चढवून राज्यकर्त्यांचे क्रियाकर्मही पूर्ण केले गेले असते. नशीब इतकेच की, ७० मुले मृत झाली हे तरी मान्य केले जात आहे. नाहीतर ‘‘कोण म्हणतेय मुलं मेली? फक्त त्यांचा श्वास बंद पडला आहे आणि त्यांच्या हातापायांच्या हालचाली थांबल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाची भाषणे त्यांच्या कानावर पडताच ही निपचीत पडलेली मुले जागी होतील व भारतमातेचा जयजयकार करतील,’’ असे ‘निवेदन’ एखाद्या शहाण्याने केले तरी आता आश्चर्य वाटणार नाही. ऑगस्ट महिन्यात येथे मुले मरतातच असे सांगणाऱ्यांना आमचा एक सवाल आहे. मग हा पटकीचा फेरा फक्त गरीबांच्या घरातच का शिरतो? ऑगस्टमध्ये मंत्र्यांच्या व

दबंगांच्या घरात हा पटकीचा फेरा का शिरत नाही? (असे दुर्दैवाने म्हणावे लागते).

आणखी वाचा - गोरखपूर प्रकरणातील दोषींची गय करणार नाही - योगी आदित्यनाथ

अशा दुर्घटना होत असतात, गोरखपूर बालमृत्यूकांडावर अमित शाहांचं बेजबाबदार वक्तव्य 

कारण गरीब हा हतबल आहे, लावारीस बनला आहे व प्रत्येक सरकार त्याला फसवून खुर्च्या मिळवीत आहे. पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १४-१५ लाखांची ‘माया’ जमा झाली असती तर या माता-पित्यांना चांगले उपचार मुलांना देता आले असते व औषध, ऑक्सिजनशिवाय पोरांचे तडफडून होणारे मृत्यू पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. गरीबांचे दुःख आणि वेदना राज्यकर्त्यांचे मन अस्वस्थ करीत नाही हेच आमच्या स्वातंत्र्याचे अपयश आहे. ही वेदनाच गरीबांची ‘मन की बात’ आहे, पण ती समजून घेण्याऐवजी त्या वेदनेची खिल्ली उडवली जाते. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सांगतात, ऑगस्टमध्ये मुले मरतातच. काय करणार त्या मंत्र्यांना! त्यांना एक सत्य सांगायला हवे. ऑगस्ट महिना हा क्रांतीचा आहे. ९ ऑगस्टला ‘छोडो भारत’ असा नारा देशभक्त लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांना दिला होता आणि १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले हे विसरू नका. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे!

टॅग्स :GorakhpurगोरखपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे