लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर रोडवरील आरमॉल समोरुन रस्ता ओलांडणाऱ्या शेषमण प्रजापती (३०) याचा शनिवारी अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.शेषमण हा कोलशेत येथील लोढा कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये राहणारा कामगार होता. १७ जून रोजी रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. त्याला काही नागरिकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेषमणचा मृतदेह अनोळखी म्हणून ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवला होता. चितळसर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली होती. दरम्यान, त्याचा शोध घेणाऱ्या केशरी प्रजापती (२८) ला जिल्हा रुग्णालयातील या बेवारस मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर त्याने २५ जून रोजी त्याची पाहणी केली. तेंव्हा आपल्याच भावाचा हा मृतदेह असल्याचे त्याने सांगितल्यानंतर त्याच्या ताब्यात शेषमणचा मृतदेह दिल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. हा अपघात कापूरबावडी भागात घडल्याचे उघड झाल्यानंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी २५ जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, गुन्हा दाखल
By admin | Published: June 27, 2017 2:01 AM