शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन, लाल मातीतला हिरा पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 10:09 AM

Wrestling, Kolhapurnews चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला चितपट करून भारताचे पहिले हिंदकेसरी बनलेले श्रीपती शंकर खंचनाळे (वय ८६, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले.

ठळक मुद्देलाल मातीतला हिरा, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन,दिल्ली काबीज करणारा चित्ता काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर : चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला चितपट करून भारताचे पहिले हिंदकेसरी बनलेले श्रीपती शंकर खंचनाळे (वय ८६, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले.

सारे जीवन लाल मातीतील कुस्तीला वाहून घेतलेला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक दिलेला नामांकित मल्ल अशी खंचनाळे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुस्तीतला जिगरबाज हिरा कायमचा लुप्त झाला. नवी दिल्लीत ३ मे १९५९ ला झालेल्या लढतीत बत्तासिंगला चितपट करून ते हिंदकेसरी झाले होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे ही लढत पाहण्यास आवर्जून उपस्थित होते.उमेदीतील प्रचंड व्यायामामुळे सारे शरीर खिळखिळे झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांना कंबरदुखीचा त्रास होता. त्यातच वृद्धापकाळाने आलेल्या व्याधीमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, तर कर्नाटक शासनाच्या ह्यकर्नाटक भूषणह्ण पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. पांढरी विजार, डोक्यावर पांढरी टोपी व अंगात पांढरा सदरा असे त्यांचे अत्यंत साधे राहणीमान होते.खंचनाळे मूळचे कर्नाटकातील एकसंबा (ता. चिक्कोडी, बेळगाव)चे. त्यांचे वडीलही पैलवान होते. त्यांनी या मुलातील कुस्तीची ओढ ओळखून त्यांना कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत पाठविले व कोल्हापूर हीच खंचनाळे यांची कर्मभूमी ठरली. पंचक्रोशीतील कुस्त्या जिंकून त्यांनी चांगलेच नाव कमावले होते. शाहूपुरी तालमीत आल्यावर वस्ताद हसनबापू तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले.

कुस्तीतील भीष्माचार्य विष्णू नागराळे, मल्लाप्पा थडके यांचाही त्यांच्यावर प्रभाव राहिला. अत्यंत धिप्पाड शरीर, वजन १२८ किलो, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि प्रतिस्पर्धी मल्लाच्या उरात धडकी भरेल असा करारी बाणा त्यांना लाभला होता. त्या बळावरच त्यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नावाजलेल्या मल्लांना अस्मान दाखविले. अत्यंत चपळाईने कुस्ती करणारा मल्ल अशीही त्यांची ओळख होती. ज्या काळात कुस्तीला अलोट प्रेम मिळाले परंतु फारसे आर्थिक पाठबळ मिळत नव्हते, तेव्हा या मल्लाने कुस्ती गाजवली.शासनाकडून पुरस्कार मिळाले, गौरव झाला; परंतु फारशी आर्थिक मदत त्यांना मिळाली नाही; तथापि तरीही त्यांनी लालमातीशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतरही नवे मल्ल घडविण्याचे काम त्यांनी केले.अलीकडील किमान वीस वर्षांत त्यांचा तालमीशी संपर्क कमी झाला असला तरी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून ते कुस्ती कलेच्या संवर्धनासाठी सक्रिय होते. या संघाचे ते पाच वर्षे अध्यक्षही होते.

आधी हिंदकेसरी... नंतर महाराष्ट्र केसरीखंचनाळे आधी हिंदकेसरी झाले व त्यानंतर त्याच वर्षी कऱ्हाडला झालेल्या लढतीत अनंत शिरगांवकर यांना हरवून ते ह्यमहाराष्ट्र केसरीह्ण झाले. त्यांच्या कुस्तीचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच चितपट झाले नाहीत.

करिअरच्या एका टप्प्यावर ते कुस्तीतून आब राखून निवृत्त झाले. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी शेतीत लक्ष घातले; परंतु कुस्तीला बट्टा लागेल असा व्यवहार त्यांच्याकडून कधीच झाला नाही. खंचनाळे पैलवान अशीच त्यांची ओळख कायम राहिली. त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, समोर कोणीही आला तरी खंचनाळे यांना नमस्कार केल्याशिवाय तो पुढे जात नसे.

टॅग्स :Wrestlingकुस्तीkolhapurकोल्हापूर