शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
2
"मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
3
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
4
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
5
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
6
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
8
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
9
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
10
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
11
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
12
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
14
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
15
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
16
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
17
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
18
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
19
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
20
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

तलासरीतील खलाशाचा पाकच्याकैदेत मृत्यू

By admin | Published: December 06, 2014 2:47 AM

पाकिस्तानच्या कराची तुरुंगात शिक्षा भोगत असताना आदिवासी खलाशी जान्या लहान्या ईभाड (५०) जि. पालघर, ता. तलासरी याचा ४ नोव्हेंबरला आजारपणाने मृत्यू झाला.

बोर्डी : पाकिस्तानच्या कराची तुरुंगात शिक्षा भोगत असताना आदिवासी खलाशी जान्या लहान्या ईभाड (५०) जि. पालघर, ता. तलासरी याचा ४ नोव्हेंबरला आजारपणाने मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल महिन्याभराने शुक्रवारी ५ डिसेंबरला पहाटे अडीचच्या सुमारास मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी डोंगरीपाडा येथील जान्या हा गुजरातच्या दीव बंदरातील मासेमारी बोटीवर खलाशाचे काम करीत होता. एप्रिल महिन्यात मासेमारी बोट पाक हद्दीत गेल्याप्रकरणी साथीदारांसह अटक करून कराची येथे तुरुंगात डांबले होते. तब्येत खालावून ४ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला. तुरुंगातील अन्य साथीदारांनी जान्याच्या कुटुंबीयांना पत्राद्वारे ही माहिती दिली. या प्रकरणात येथील सामाजिक कार्यकर्ता प्रकाश सांबर यांनी खा. चिंतामण वनगा यांच्याशी संपर्क साधला. वनगा यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली. पाकिस्तानातील भारताचे हायकमिशनर नरेश बत्रा यांनी पाक शासनाशी संपर्क साधला त्यानंतर कराचीमार्गे मुंबईला विमानाद्वारे मृतदेह आणण्यात आला. यावेळी बोटमालक रामजी सोलंकी यांना बोलावण्यात आले होते. शुक्रवारी मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविला. (वार्ताहर)