ऑनलाइन लोकमतबीड, दि. 3 - मळमळ उलटी होऊन दोन भावंडांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी घडली. फळातून विषबाधा झाल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे, तर सर्पदंश असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनाही मृत्यूचे नेमके कारण कळत नसल्याने दोन्ही मुलांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.साई भारत शिंदे (वय २) व ओम भारत शिंदे (वय ५ रा. गोलंग्री ता. बीड) अशी मृत बालकांची नावे आहेत. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते झोपले होते. बुधवारी पहाटे झोपेतच त्या दोघांना मळमळ आणि उलटी होऊ लागली. काही वेळातच ते अत्यवस्थ झाले. त्यांना सकाळी सहा वाजता शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओमला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर सात तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर साईनेही प्राण सोडले. भारत यांना दोनच मुले होती. दोन्ही मुलांच्या मृत्यूने त्यांच्यावर एकीकडे दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, भारत यांची पत्नी प्राजक्ता यांचीही प्रकृती खालावली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दुपार पर्यंत मुलांच्या मृत्यूची बातमी प्राजक्ता यांना कळवण्यात आली नव्हती पण दुपारी साईच्या मृत्यूनंतर ही बातमी त्यांना सांगण्यात आल्यावर त्यांनी आक्रोश केला. या घटनेने रु ग्णालय परिसर सून्न झाला होता. फळातून विषबाधेचा संशयओम आणि साई यांचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे उत्तरीय तपासणीनंतर कळणार आहे. मात्र, नातेवाईकांनी सफरचंद, चिकूतून विषबाधा झाल्याचा दावा केला आहे. फळांमधून विषबाधा होऊन इतक्या पटकन मृत्यू होऊ शकतो का यावर डॉक्टरही संभ्रमात आहेत, तर झोपेत सर्पदंश झाल्याचा अंदाज सुरुवातीला होता. परंतु त्यांच्या अंगावर कुठेही दंशाचे व्रण नाहीत. शिवाय ओम हा पलंगावर तर साई जमिनीवर झोपलेला होता. त्यामुळे दोघांनाही दंश होऊ शकेल का, अशा शंका डॉक्टरांना आहेत. शिवाय सर्पदंशाची प्राथमिक लक्षणेही दिसून येत नसल्याने नेमकी विषबाधा कशातून झाली आणि मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट न झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण म्हणाले.
विषबाधा झाल्यानं दोन चिमुकल्यांचा मृत्यू
By admin | Published: May 03, 2017 9:21 PM