मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे. कारण, याच कमिटीने आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३ लाख ३६ हजारांनी कमी केल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांवर संशयाची सुई रोखली गेलीआहे.राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू होताच ३३पैकी पाच प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्याकडील शेतकरी खातेदारांची संख्या अवघ्या काही दिवसांत लाखांनी कमी केल्याने कोट्यवधींचा सरकारी निधी हडप करणारी यंत्रणा बँकांच्या पातळीवर काम तर करत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करताना ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर केले होते. हा आकडा स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (एसएलबीसी)ने मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ज्या शेतकºयाला कर्जमाफी दिली जाणार आहे, त्याची नोंदणी करण्याची कल्पनामांडली.मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी मिळून यात पारदर्शकता आणण्यासाठी काही अटी व शर्ती लागू करत कर्जदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला.निर्माण झालेले प्रश्न-राष्टÑीयीकृत बँकांनीसरकारला दिलेली आकडेवारी अचानक कशी कमी झाली?जुन्या आकडेवारीच्याआधारे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून या बँकांनी व्याजापोटी व अन्य कोणत्या गोष्टीसाठी किती रक्कम याआधी घेतली आहे का?89 लाखांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून सरकारने निधी उपलब्ध करुन दिला असता तर तो आज कोणाच्या खात्यात जमाझाला असता?जिल्हा सहकारी बँकांच्या खातेदारांची संख्या ३६ लाख, कर्ज पुनर्गठनाचा फायदा मिळणारे १० लाख खातेदार अशी ही संख्या४६ लाखांच्या घरात आहे. एसएलबीसीने सांगितलेल्या ८९ लाखांतून हे ४६ लाख कमी केले तर ती संख्या होते ४३ लाख होते. मात्र७ आॅक्टोबरच्या सायंकाळपर्यंत राष्टÑीयीकृत बँकांनी राज्य सरकारला कळविलेली खातेदारांची संख्या २९,६३,८४१ इतकी आहे. याचाच अर्थ १३,३६,१५९ खातेदार शेतकरी गेले कुठे? याचे उत्तर एसएलबीसीकडे नाही.चौकशी करू : सहकारमंत्रीआज आमचे प्राधान्य शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आहे. कोणत्या बँकेने किती खातेदार कमी सांगितले? का सांगितले? या सगळ्याची नंतर चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण गरीब शेतकºयांचे व जनतेचे करातून मिळणारे पैसे कोणालाही हडप करू दिले जाणार नाहीत.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री
कर्जमाफीचे गौडबंगाल :१३ लाख शेतकरी गेले कुठे? ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात
By अतुल कुलकर्णी | Published: October 10, 2017 4:07 AM