मुंबई : डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार करणा:या देशांच्या यादीत आता भारताने 13 वा क्रमांक पटकाविला असून, 2क्15 र्पयत जगात भारत पहिल्या दहात असेल अशी माहिती व अंदाज एका आंतरराष्ट्रीय सव्रेक्षण कंपनीने व्यक्त केला आहे.
जगातील 5क् प्रमुख देशांत पैशांच्या व्यवहारांसाठी कार्ड व्यवस्थेचा किती वापर होतो, यासाठी करण्यात आलेल्या सव्रेक्षणातून अनेक रंजक बाबी समोर आल्या आहेत. यानुसार, पॉइंट ऑफ सेल मशीन (ज्यावर आपले कार्ड स्वाईप केले जाते), याचा प्रसार भारतामध्ये तळागाळार्पयत पोहोचताना दिसत असून, मेट्रो शहरे, प्रथम,द्वितीय श्रेणीतील शहरांसोबतच ग्रामीण भागांतूनही हे जाळे पसरताना दिसत असल्याची माहिती या सव्रेक्षणातून नोंदविण्यात आली आहे.
कार्डावरून होणा:या व्यवहारामुळे प्रत्यक्ष चलनाचा वापर होत नाही, परिणामी चलनाच्या व्यवहाराच्या खर्चात मोठी कपात होते. हे व्यवहार सुलभ होताना त्याची नोंद राखणोही शक्य होत असल्याने तसेच याची उपयुक्तता पटल्याने भारतात याचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षापासून वर्षाकाठी किमान 15 टक्के दराने याचा प्रसार होत आहे. हा प्रसार किती होत आहे, याची आकडेवारी सादर करताना या अहवालात म्हटले आहे की, 2क्13 मध्ये पॉइंट ऑफ सेलची 8 लाख नवीन मशीन्स बसविण्यात आली, तर 2क्14 मध्ये आणखी 11 लाख मशीन्स बसवली जातील.
केवळ या मशीन्सचाच वापर वाढताना दिसत नाही, तर त्याला गती मिळेल याच वेगाने डेबिट आणि क्रेडिट या दोन्ही कार्डाचा वापरही वाढत आहे. 2क्12 च्या तुलनेत 2क्13 मध्ये कार्डाच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांत 35 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. मोठय़ा वस्तूंच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून तात्काळ कर्ज उपलब्धीस पुन्हा रिझव्र्ह बँकेने मान्यता दिल्याने याच्या वापराने पुन्हा जोर पकडला आहे. (प्रतिनिधी)
4केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी वित्तीय समायोजनाचे धोरण राबविण्यास सुरुवात केली. या योजनेअंतर्गत गावखेडय़ार्पयत बँकिंग प्रणाली पोहोचणार आहे. सध्या एकूण लोकसंख्येच्या 6क् टक्के लोकांकडे अद्यापही डेबिट-क्रेडिट कार्डाची सुविधा नाही. त्यामुळे ही सुविधा वाढल्यास ग्राहकाची तर सोय होईलच; पण जागतिक क्रमवारीतही भारत वरचा क्रमांक प्राप्त करू शकेल.