शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

कर्जमाफी : भाजपाची फिल्डिंग, रात्री उशिरा घेतली काँग्रेस नेत्यांची भेट

By admin | Published: June 24, 2017 5:30 AM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपाने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 -  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपाने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीची समस्या सोडविण्यासाठी स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी लागू कराव्यात. अशी मागणी कांग्रेसनं भाजपाकडे केली आहे. कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशीरा भाजपा आणि काँग्रस नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. माध्यमांच्या वृत्तानुसार, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न तात्काळ सोडवण्याचा आदेश राज्यातील भाजपा नेत्यांना दिला आहे. त्यामुळे भाजपा नेते सतत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहे. शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेबरोबरच राष्टपती पदाच्या मतासाठीही प्रयत्न सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीबाबत चर्चा केली यावेळी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नसीम खान उपस्थित होते. यावेळी काँग्रेसने शेतकरी कर्जमाफी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेस पक्षा तर्फे शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यांचे निवेदन भाजपा नेत्यांना दिले. 

यामध्ये त्यांनी बरेच महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशीवर राज्य सरकारने विचार करावा हा आहे. त्याचप्रमाणे, जमीन क्षेत्राची अट ठेवू नका तसेच १ लाखाची मर्यादा न घालता जून 2017 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतक-यांना तातडीने बेबाकी प्रमाणपत्र द्यावेत आणि शेतक-यांचा सातबारा कोरा करावा. तसेच शेतीमालाला भाव नव्हता त्यामुळे नुकसान झालेल्या पण थकबाकीदार नसलेल्या शेतक-यांनाही भरपाई द्यावी.

10 हजार रूपये मदत देण्याच्या जीआर मधील जाचक अटी रद्द कराव्यात,आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या कुटुबांचे पुर्नवसन करावे. शेतक-यांना उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के भाव देण्याबाबत ठोस कारवाई करावी. अंदोलनादरम्यान झालेले शेतक-यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, असेही ते म्हणाले. नियमीत कर्ज फेडणा-यांना वेगळं पॅकेज द्यावे. कर्जमाफी संदर्भात सरकारने तात्काळ मंत्रीमंडळ बैठक घेऊन निर्णय घ्यावा आणि त्याचा जीआर काढावा. सरकारने राज्य कृषीमूल्य आयोगाची स्थापना केली मात्र दोन वर्ष त्याला अध्यक्ष नसल्याने आत्महत्या वाढल्याचेही त्यांनी आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री - शरद पवार यांची दिल्लीत भेटराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रामनाथ कोविंद यांना मदत करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पवार यांना केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पवार यांच्यात बंद खोलीत कोविंद यांना राष्ट्रवादीची मते मिळावीत यासाठी चर्चा झाल्याचे कळते. राष्ट्रपती-पदाच्या निवडणुकीत व्हिप काढला जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची मते कोविंद यांच्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

अटी, शर्थींशिवाय सरसकट कर्जमाफी : सदाभाऊ खोतकोणत्याही अर्टी, शर्थींशिवाय व एकरांचे बंधन रद्द करून कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याबाबत आदेश होऊन ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी दिली. २00८ मध्ये झालेली कर्जमाफी आणि आताच्या कर्जमाफीच्या निर्णयात खूप फरक आहे. त्यावेळची पाच एकराच्या आतील ३६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९00 कोटीची कर्जमाफी दिली होती. आता जवळपास त्यात तिप्पट वाढ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आम्ही या योजनेत सामावून घेतले आहे.