शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही- उद्धव ठाकरे

By admin | Published: June 25, 2017 2:26 PM

शेतक-यांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 25 - शेतक-यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा निर्णय हा समाधानकारक नाही. शेतक-यांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नाशिकमधल्या संवाद यात्रेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, शेतक-यांचे 2017पर्यंतचे कर्ज माफ व्हायला हवे, कर्जमाफीचा शेतक-यांना काहीही लाभ झालेला नाही, शेतक-यांना मिळालेली कर्जमाफी शिवसेनेच्या रेट्यामुळेच मिळाली आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपालाही लक्ष्य केलं आहे. शेतमालाच्या हमीभावासाठी पाठपुरावा करणार आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कर्जमाफीचा निर्णय हा ऐतिहासिक असला तरी समाधानकारक नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.कर्जमाफीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस सरकारला कोंडीत पकडणा-या शिवसेनेने कर्जमाफीच्या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत केले होते. सत्तेत राहून विरोध कसला करता ? असा प्रश्न आम्हाला विचारण्यात येत होता. पण सत्तेत राहून काय करता येते हे आम्ही दाखवून दिले, असे सांगत शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या आग्रहामुळे दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी सरकारने जाहीर केली, असंही रावतेंनी सांगितलं होतं. सरकारच्या घोषणेमुळे सर्वसामान्य शेतक-याला फायदा होणार असून सातबारा कोरा होणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले असून, त्यामुळे 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.