ऑनलाइन लोकमत
किल्लारी (जि. लातूर), दि.15 - औसा तालुक्यातील किल्लारी येथे बुधवारी पहाटे डिंगबर माधवराव टाचले (वय 46) शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. किल्लारी येथील राहत्या घरी सर्वजण जागे असतानाच स्वतःच्या खोलीत जाऊन रोगर नावाचे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर पत्नी ,आईला वेगळा वास येत असल्याने दार उघडले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे दाखल करण्यात आले.
तेथे डॉ. लांडे यांनी प्राथमिक उपचार करुन त्यांना शासकिय रुग्णालय लातूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले. मात्र, तेथे नेल्या नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिगंबर टाचले यांच्या नावावर तीन एकर जमीन आहे व वडील माधवराव यांच्या नावावर 3.20 साडेतीन एक्कर कोरडवाहू शेती आहे.
टाचले यांच्या नावावर सोसायटीचे अकरा हजाराचे कर्ज आहे तर मुलीच्या लग्नासाठी वडील माधवराव टाचले यांच्या नावावर शुभमंगल या योजनेचे सत्तर हाजार कर्ज घेतल्याचे समजते. मुलीचे लग्न केले असून मुलगा अविवाहित आहे. याबाबत तलाठी व्यंकट पवार यांनी तहसीलदार औसा यांना शेतकरी आत्महत्या असल्याचा अहवाल सादर केला आहे, अशी माहीती तलाठी व्यंकट पवार यांनी दिली .दिगंबर टाचले यांच्या पश्चात आई,वडील भाऊ,बहीण,पत्नी ,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.