लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळातील शेती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (एसटी) कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. एसटी हे उत्पादित महामंडळ असल्याने, गरजू एसटी कर्मचाऱ्यांची शेतकर्ज माफ केली जाणार आहेत. या संबधीचा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी झालेल्या मंत्रिगट बैठकीत घेतला आहे. मात्र, याचबरोबर अधिकाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचेही दिवाकर रावते यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले आहे.
शेती करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना कर्जमाफी
By admin | Published: June 20, 2017 1:26 AM