ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - राज्य सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. शतकऱ्यांना पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्जमाफ करण्यात आले आहे. 40 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. नियमित कर्ज भरणार्यांना 25 हजार रु. अनुदान मिळेल. 89 हजार हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यूपीए च्या काळात देशात 52 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यातील 7 हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. मागच्या कर्जमाफीवेळी घोटाळे झाले होते, ते होऊ नये याकडे लक्ष द्यावे लागेल. कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण येईल, यातून मार्ग काढू. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली आहे, बँकांशी प्राथमिक चर्चा झाली आहे.दरम्यान, शेतकऱ्यांना 10 हजार पर्यंत तात्काळ कर्ज उपलब्ध केले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. कर्जमाफीनंतर नागपुरात अगमनस्थ झालेल्या मुख्यमंत्रीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी निर्णयाचे स्वागत करून हा निर्णय ऐतिहासिक सोबत संवेदनशील असल्याचे सांगितले. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, शेतकरी आत्महत्या करणार नाही. असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.