शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

कर्जमाफी! परतफेड ३१ मार्च १८ पर्यंत!

By admin | Published: July 01, 2017 2:46 AM

दीड लाख रुपयांवरील कृषी कर्जाची रक्कम फेडण्यासाठीची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०१८ ही असेल. त्यामुळे मोठ्या रकमेचे थकबाकीदार

यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड लाख रुपयांवरील कृषी कर्जाची रक्कम फेडण्यासाठीची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०१८ ही असेल. त्यामुळे मोठ्या रकमेचे थकबाकीदार असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शुक्रवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. दीड लाख रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी ज्या शेतकऱ्यांकडे आहे. त्यांनी अधिकची रक्कम भरली तर दीड लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे २८ जून रोजी निघालेल्या कर्जमाफीच्या शासकीय आदेशात नमूद करण्यात आले होते. तथापि, ही अधिकची रक्कम कधीपर्यंत भरता येईल, याची कोणतीही मुदत त्या आदेशात देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला सांगितले की, या थकबाकीच्या परतफेडीची मुदत ही ३१ मार्च २०१८ असेल. दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शासनाने सरसकट माफ केले आहे. त्याचा फायदा ३६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. दीड लाखावर कर्ज असलेल्या ८ लाख शेतकऱ्यांना अधिकची रक्कम भरताना तजविज करता येण्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्यादृष्टीनेच पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जाणकारांच्या मते या निर्णयाने जसा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तसा कर्जमाफीच्या निर्णयाने आर्थिक बोजाखाली दबलेल्या सरकारवर एकाचवेळी दडपण येणार नाही. ३६ लाख शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देताना सरकारवर मोठा बोजा येईल. त्याचवेळी दीड लाखावरील थकबाकीदारांना दोन महिन्यांची मुदत दिली असती आणि त्या मुदतीत त्यांनी थकबाकी परत केली असती तर सरकारवर एकाचवेळी मोठा आर्थिक ताण पडला असता. ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत दिल्याने आता तसे होणार नाही. ‘त्या’ परतफेडीला मिळणार मुदतवाढ -नियमित कर्ज परतफेड केल्यास २५ हजार रुपये वा थकबाकीच्या २५ टक्के यापैकी कमी असलेली रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून ज्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यांना परतफेडीची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे. ही मुदत जूनअखेर होती. तरीही अनेक शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे शासन किमान एक महिन्याची मुदतवाढ देईल, अशी शक्यता आहे. या बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, या परतफेडीचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल. २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल, असे कर्जमाफीच्या आदेशात म्हटले होते. शेतकरी कर्जमाफीत घेणार जनतेच्या देणग्याराज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात आपलेही योगदान असावे, या भावनेने विविध व्यक्ती आणि संस्था पुढे येत असताना आता अशा देणग्या स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खाते सुरू करण्यात आले आहे. संस्था आणि व्यक्तींनी दिलेली देणगी या खात्यामध्ये जमा केली जाणार असून ही रक्कम शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठीच उपयोगात आणली जाईल.मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून भारतीय स्टेट बँकेच्या फोर्ट येथील मुंबई मुख्य शाखेमध्ये उऌकएऋ टकठकरळएफर ऋअफटएफ फएछकएऋ ऋवठऊ या नावाने ३६९७७०४४०८७ क्रमांकाचे खाते उघडण्यात आले आहे. या शाखेचा कोड ००३० आणि आयएफएससी कोड रइकठ ००००३०० असा आहे. या खात्यावर इच्छुक देणगीदारांना एनईएफटी अथवा धनादेशाच्या माध्यमातून पैसे जमा करता येतील.