ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 2 - शासनाने कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय संभ्रम निर्माण करणारा असून यासाठी आम्ही 10 जुलैपासून शेतकऱ्यांना शासनाच्या फसव्या जीआरची माहिती देण्यासाठी जनजागृती चळवळ सुरू करीत असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. पंढरपुरातील भोसे येथे पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभारलेल्या संपादरम्यान राज्यभर शेतकऱ्यांचा बाजूने वातावरण होते, असे असताना शिवाजी महाराजांच्या नावाने शासनाने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय मलमपट्टी करणारा आहे. कर्जमाफीच्या निर्णयातील निकष चुकीच्या पद्धतीने लावले असून, भोसे येथील 2 कोटी 31 लाख थकबाकी आहे. चुकीच्या निकषांमुळे निव्वळ 45 लाख रुपयेचा कर्जमाफीमध्ये लाभ होणार आहेत. शासनाने केलेल्या फसव्या कर्जमाफी निर्णयाच्या जीआरची माहिती देण्यासाठी आम्ही 10 जुलैपासून जनजागृती चळवळ सुरू करीत असून यामध्ये कोणाचाही वैयक्तिक हेतू साध्य करणार नसल्याचे आ. कडू यांनी सांगितले.
कर्जमाफीचा निर्णय संभ्रम निर्माण करणारा- आ. बच्चू कडू
By admin | Published: July 02, 2017 9:28 PM