अभिनय खोपडेवर्धा : राज्यात भाजपासोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेवरून विदर्भात भाजपाच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे. विदर्भाच्या विविध तालुका मुख्यालयात सेनेने बँकांसमोर मंडप टाकून शेतकºयांकडून अडचणी लिहून घेण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे.शेतकºयांना कर्जमाफी देण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेनेनेही आग्रहीपणे लावून धरली होती. राज्य शासनाने शुक्रवारपासून शेतकºयाच्या खात्यात पैसे जमा करण्याची व्यवस्था केली. मात्र बँकेत शेतकºयांना अनेक अडचणी येत आहेत.शिवसेनेचे कार्यकर्ते शेतकºयांच्या अडचणी दूर करण्यास मदत करतील. सर्व काम शिवसैनिक करून देतील. अनेकांनी या कर्जमाफीचे श्रेय घेणारे फलक गावागावात लावले आहेत. ‘ते फलकावर तर आम्ही शेतकºयांसोबत मदतीसाठी आहोत’ हाही संदेश या अभियानातून द्यायचा आहे.- अशोक शिंदे, संपर्कप्रमुख, शिवसेना तथा माजी आमदार, हिंगणघाट
कर्जमाफीवरून शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 3:09 AM