शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

हुंडा प्रतिबंधक अधिकारी नेमण्याचा निर्णय घ्या

By admin | Published: June 17, 2016 3:07 AM

हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे हुंडा प्रतिबंधक अधिकारी नसल्याने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने प्रत्येक

मुंबई : हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे हुंडा प्रतिबंधक अधिकारी नसल्याने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने प्रत्येक जिल्ह्यात एक हुंडा प्रतिबंधक अधिकारी नेमण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घ्या, असा आदेश राज्य सरकारला दिला. तसेच तीन महिन्यांत सल्लागार मंडळ नेमण्याचेही आदेश न्यायालयाने सरकारला दिले.वधू-वर सूचक संकेतस्थळांवरूनही उघडपणे हुंडा मागत आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांवर कारवाई करण्यात यावी. तसेच कायद्याचीही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रिसिला सॅम्युअल यांनी उच्च न्यायालयात केली. गुरुवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता रोहित देव यांनी संकेतस्थळांबाबत जाहिराती प्रसिद्ध न करण्याचे आवाहन वर्तमानपत्रांना केले असल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘वर्तमानपत्रांना अशा जाहिराती प्रसिद्ध न करण्याचे आवाहन केले आहे. तरीही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय अशा संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत. लवकरच ही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात येतील,’ अशी माहिती अ‍ॅड. देव यांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर खंडपीठाने केंद्र सरकारला ८ जुलै रोजी या मागदर्शक तत्त्वांचा मसुदा सादर करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, अ‍ॅड. देव यांनी आर्थिक चणचणीमुळे स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे हुंडा प्रतिबंधक अधिकारी नेमणे शक्य नसल्याचे खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी) स्वतंत्र यंत्रणा नेमा‘जोपर्यंत स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे अधिकारी नेमण्यात येत नाहीत, तोपर्यंत या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार नाही. केसेसचे प्रमाण वाढतच राहणार. त्यामुळे सरकारने येत्या तीन महिन्यात्ां अधिकारी नेमण्याबाबत निर्णय घ्यावा. तोपर्यंत महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रथम श्रेणीतील अनुभवी अधिकाऱ्याला हा पदभार सांभाळण्याचे आदेश द्यावेत. तसेच महिलांना तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र यंत्रणाही नेमा,’ असा आदेश न्यायालयाने दिला.