लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सत्तेत रहायचे आणि विरोधही करायचा, अशा दोन्ही भूमिका घेता येणार नाहीत, असा इशारा देतानाच सत्तेत राहायचे की नाही याचा निर्णय शिवसेनेने एकदाचा घेऊन टाकावा असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.मंत्री पाटील म्हणाले, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची नारायण राणे यांनी दिल्लीत घेतलेली भेट ही त्यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडिकल कॉलेजसंदर्भात होती. दोन्ही बाजूंकडून चर्चा झाली असली तरी भाजपला जे काही सांगायचे आहे ते अमित शहा यांच्या माध्यमातून राणे यांना सांगण्यात आले. यापुढील निर्णय त्यांच्यावरच सोपविला आहे.
राणे हे निर्णय घेण्यात अचूक असून ते दसºया दिवशी योग्य निर्णय घेतील.’मंत्री पाटील म्हणाले, ‘शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. त्यांची मानसिकता बाहेर पडण्याची दिसत नाही. हक्काची माणसेसुद्धा एकमेकांशी भांडतात परंतु त्यांचे भांडण हे रस्त्यावर येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या मंत्री व आमदारांसाठी नेहमीच उपलब्ध आहेत. त्यांचे काय विषय असतील ते त्यांनी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जावे. जे विषय गैरसमजातील असतील ते चर्चेतून दूर होतील व काही तर्क सुसंगत असतील ते मुख्यमंत्री मान्य करून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्जमाफी होईल त्यावेळी शेतकºयांना १० हजार रुपये द्यावेत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. ते मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य केले. हे बँकिंग नियमावलीच्या विरोधात होते; परंतु ही सूचना तर्कसंगत असल्याने मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरना भेटून राज्य सरकार बँक गॅरंटी घेईल, असे सांगितले. असे असताना कांहीतरी खुसपट काढून वाद निर्माण करणे योग्य नाही.दुटप्पी भूमिकाशिवसेनेनेची विरोधी पक्षाची भूमिका योग्य नाही. सत्तेत राहायचे आणि विरोध करायचे अशा दोन भूमिका लोकशाहीत घेता येत नाहीत. त्यामुळे शिवसेनेला सत्ताधारी पक्षाच्या धोरणानुसारच भूमिका घ्यावी लागेल. त्यांना जर भूमिका मांडायची असेल किंवा आपल्या तीव्र भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी जरूर व्यक्त कराव्यात; परंतु त्या चार भिंतीच्या आत, असा आपुलकीचा सल्ला महसूल मंत्री पाटील यांनी दिला.
शिवसेनेचे हसे..शिवसेनेला आपण विरोधाची भूमिका घेऊन लोकप्रिय होतोय असे वाटत असेल तर चुकीचे आहे. यावरून त्यांचे घराघरांत हसे होत आहे. मीही मुंबईकर असल्याने शिवसेनेचे मुंबईतील योगदान मला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:चे नुकसान करून घेऊ नये, असा सल्ला मंत्री पाटील यांनी दिला. भाजपबरोबर जमत नसेल तर शिवसेना बाहेर का पडत नाही? असा सवालही लोक घरात चहा पिताना करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
देसाई यांना पाठबळउद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर मुख्यमंत्री ठामपणे त्यांंच्या पाठिशी राहिले. तेच जर उद्धव ठाकरे तिथे असते तर तसे राहिले नसते असेही चंद्रकांतदादा यांनी सांगितले.राणे दसºयाला अचूक निर्णय घेतीलनिर्णय घेण्यात अचूक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दसºयादिवशी निर्णय घेतील, असेही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका प्रश्नावर सांगितले.