पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘सर्व विषयांसाठी एकच पुस्तक’ हा नवा पथदर्शी प्रकल्प बालभारतीतर्फे हाती घेण्यात आला आहे. मात्र, राज्यातील काही तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांकडून मिळणाºया प्रतिसादानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांसाठी केली जाईल. त्यातच विद्यार्थी, शिक्षक व पालकांना ही कल्पना कितपत भावते त्यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे, अशा प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहेत.काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे वाढत चालले असल्याने ते कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, अजूनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झालेले नाही. त्यामुळेच पुस्तकांचे वेगवेगळे भाग करून ‘बालभारती’कडून पुस्तकांच्या छपाईचे काम सुरू केले आहे. परंतु, एकच पुस्तक केल्यामुळे तरी दप्तराचे ओझे कमी होणार का? याबाबत शिक्षणतज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहे.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, ‘‘राज्याच्या शिक्षण विभागातर्फे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध योजना व उपक्रम हाती घेतले गेले; परंतु त्यांची कार्यवाही योग्य पद्धतीने झाली नाही. प्रत्येक वेळी कार्यवाहीच्या पातळीवर विसंगती अढळून आली.’’ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व ‘बालभारती’चे माजी संचालक डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, ‘‘पुस्तकाचा आकार कमी केल्यामुळे दप्तराचे ओझे कमी होणार का? हे येणाºया काळात आपल्याला दिसून येईल. सुरुवातील राज्यातील मर्यादित शाळांमध्येच हा पथदर्शी प्रकल्प राबवावा. पूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये राबविण्याची आवश्यकता नाही.’’...........दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील एका तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध भाग केलेल्या पुस्तकांचे वितरण केले जाईल. या पथदर्शी प्रकल्पाला विद्यार्थ्यांकडून मिळणाºया प्रतिसाद विचारात घेतला जाईल. तसेच, शासनाकडून प्राप्त होणाºया आदेशानुसार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल- विवेक गोसावी, संचालक, बालभारती
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून सर्व विषयांसाठी एका पुस्तकाचा घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 2:47 PM
तरच या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांसाठी केली जाईल
ठळक मुद्दे‘बालभारती’तर्फे प्रकल्प : दप्तराचे ओझे कमी करणार