पुणे : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षांना सामोरे जावे लागू शकते,असे सूचक वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पुण्यात केले.वन विभागातर्फे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात जावडेकर यांनी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याबाबत सर्व राज्यांशी संवाद साधला. सुमारे २५ राज्यांनी त्यास होकार दर्शविला असून काही राज्यांनी त्यासंदर्भातील निर्णय स्वत:च घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र,परीक्षा घेण्यासंदर्भातील कायदा केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर केला आहे.त्यावर लवकरच निर्णय होईल.परिणामी येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. (प्रतिनिधी)
‘पाचवी, आठवी परीक्षांबाबत लवकरच निर्णय’
By admin | Published: April 02, 2017 1:29 AM